वृत्तसंस्था /माद्रीद
एटीपी टूरवरील माद्रीद मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 2021 सालातील माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धा एक आठवडय़ाऐवजी दोन आठवडे चालणार असल्याचे एटीपी आणि डब्ल्यूटीए स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धा पुरूष आणि महिलांसाठी प्रत्येकवर्षी क्ले कोर्टवर घेतली जाते. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाकरिता महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता 2021 सालातील माद्रीद मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धा 27 एप्रिल ते 9 मे दरम्यान होणार आहे. 27 एप्रिलला या स्पर्धेला प्रारंभ होणार असून याचवेळी डब्ल्यूटीए प्रथमिक फेरी घेतली जाणार आहे. महिलांच्या अंतिम ड्रॉमध्ये पहिल्या फेरीला 29 एप्रिलपासून प्रारंभ होईल तर पुरूषांच्या पात्र फेरीला शुक्रवार 30 एप्रिलपासून प्रारंभ केला जाईल. पुरूषांच्या विभागातील पहिल्या फेरीला रविवार 2 मेपासून प्रारंभ होईल.