तरुण भारत

भारतातील दोन टेनिस स्पर्धा लांबणीवर

वृत्तसंस्था / पुणे

2021 सालातील टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुली तसेच बेंगळूर खुली चॅलेंजर्स पुरूषांची टेनिस स्पर्धा कोरोना समस्येमुळे बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.

भारतातील या टेनिस स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी घेण्यात येणार होत्या पण देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांना घ्यावा लागत आहे. या स्पर्धांच्या पुढील तारखा लवकरच जाहीर करू तसेच या संदर्भात एटीपीला भारतीय टेनिस संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे, अशी माहिती पुणे येथे होणाऱया टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुल्या चॅलेंजर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार तसेच बेंगळूरमधील चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेचे संचालक सुनील यजमान यांनी दिली आहे. 2021 च्या भारतातील टेनिस हंगामाला मार्च-एप्रिलनंतर प्रारंभ करण्याचा प्रयत्न राहील, असे तामिळनाडू संघटनेचे सीईओ हितेन जोशी यांनी सांगितले.

Related Stories

ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि शर्यत लांबणीवर ?

Patil_p

फॉर्म कायम राखणे आव्हानात्मक असेल

Patil_p

टेनिस स्पर्धेतून बार्टीची माघार

Patil_p

साक्षी, मीराबाईला ‘अर्जुन’ यादीतून वगळले

Patil_p

भारतीय कसोटी संघाचा सराव सामना आजपासून

Patil_p

रोहित शर्माची ‘खेलरत्न’साठी शिफारस

Patil_p
error: Content is protected !!