तरुण भारत

रूमानियाचे तीन वेटलिफ्टर्स अपात्र

वृत्तसंस्था/ लॉसेनी

उत्तेजक चांचणीत दोषी आढळल्याने 2012 च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या रूमानियाच्या तीन वेटलिफ्टर्सना अपात्र ठरविल्याचे घोषणा बुधवारी करण्यात आली. अपात्र ठरविण्यात आलेल्या रूमानियाच्या वेटलिफ्टर्समधील दोघांनी लंडन ऑलिंपिकमध्ये पदके मिळविली होती.ं

रूमानियाच्या रेझवान मार्टिनने 69 किलो वजन गटात कास्यपदक तसेच रूमानियाची महिला वेटलिफ्टर रॉक्सेना कोकोसने रौप्यपदक मिळविले होते. रूमानियाचा तिसरा वेटलिफ्टर गॅब्रियल सिनक्रेनला लंडन ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविता आले नव्हते. दरम्यान रूमानियाच्या या तीन वेटलिफ्टर्सची उत्तेजक चांचणी घेण्यात आली. त्यांच्या मुत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याने त्यांना आता अपात्र ठरविण्यात आले आहे. रूमानियाच्या पदक विजेत्या वेटलिफ्टर्सना लंडन ऑलिंपिकमधील मिळविलेली पदके परत करावी लागणार आहेत.

Related Stories

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळ बरखास्त

Patil_p

आय लीगमधील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

व्हिएतनाममध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा तहकूब

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

prashant_c

उमेश यादव उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p

स्नेहाशिषच्या कुटुंबियांना कोरोना

Patil_p
error: Content is protected !!