तरुण भारत

आयएसएलमधील कोलकाता डर्बी आज वास्कोच्या टिळक मैदानावर

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

जगातील सर्वात जुनी फुटबॉल डर्बी म्हणजे कोलकाता डर्बी. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱया एससी ईस्ट बंगाल आज शुक्रवारी वास्कोच्या टिळक मैदानावर आपली मोहिम आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ एटीके मोहन बागान विरूद्ध उघडेल. या ऐतिहासिक डर्बीत ईस्ट बंगालचे रॉबी फाऊलर आणि एटीकेचे लोपेझ हबास यांची मदार अनुभवावर असेल.

भारतातील अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेत हे दोन बलाढय़ संघ सहभागी झाल्यामुळे संपूर्ण फुटबॉल जगतामध्ये या लढतीविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. ईस्ट बंगालचे प्रशिक्षकपद लिव्हरपूल एफसीचे माजी लीजेंड रॉबी फाऊलर यांच्याकडे आहे. ते ईस्ट बंगालच्या नवीन पथकाचा कार्यभार स्वीकारतील आणि आपली मोहिम विजयाने करण्याचे लक्ष्य असेल.

ईस्ट बंगालने यंदा जेजे लालपेखलुआ, युजेंसन लिंगडोह आणि बलवंत सिंग प्रतिभावन भारतीय फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. विदेशी फुटबॉलपटू अँथनी पायकिंग्टन आणि जॅक माघोमा यांच्यासह कर्णधार डिलन फॉक्स यांचा प्रोफेशनल फुटबॉलपटूंचा अनुभवही ईस्ट बंगालशी असेल. यामुळे मुख्य प्रशिक्षक म्हणून ईस्ट बंगालसाठी दुसरी खेळी सुरू करताना फाऊलर यांचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असेल.

‘माझ्या संघात कर्णधार बरेच आहेत. फॉक्स हा तर कर्णधारांचा कर्णधार असल्याचे 45 वर्षीय फाऊलर म्हणाले. त्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. भव्य डर्बीच्या रूपातील पहिल्या सामन्याची तयारी करीत असताना आमच्या संघाला प्रगतीपथावर नेण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धी त्याच्याकडे आहे. माझी त्याच्याशी चर्चा झालेली आहे. डर्बीबद्दलही आम्ही सखोल चर्चा केली आहे, असे संघाचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर म्हणाले.

आयएसएलची दोन जेतेपदे मिळवून देणारे एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक आंतोनियो लोपेझ हबास यांच्याकडे अनुभवाची कमतरता नाहीयं. एटीके मोहन बागान हा एक मजबूत संघ असून या संघाने आपल्या यंदाच्या हंगामाची सुरूवात केरळ ब्लास्टर्सविरूद्ध 1-0 अशा विजयाने केली आहे. ‘आजची कोलकाता डर्बी हा एक विशेष सामना आहे आणि तो माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. ‘सिटी ऑफ जॉय‘ असे संबोधल्या या सामन्याबद्दल कोलकातात आणि देशभर काय तीव्रता आहे आणि समर्थकांसाठी काय आहे, हे मला माहित आहे, असे हबास म्हणाले. माझ्या एटीकेच्या समर्थकांना मला आनंद मिळवून दय़ायचा आहे, असे हबास म्हणाले. या प्रतिष्ठतेच्या लढतीत श्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठीच्या ऐतिहासिक चुरशीला नवे व्यासपीठ मिळेल आणि त्याचबरोबर नव्या युगाचा आरंभ होईल

Related Stories

केकेआरचा राजस्थानला जोरदार धक्का

Omkar B

वादळ ख्रिस गेलचे, विजय मात्र राजस्थानचा!

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये टी-10 क्रिकेट असावे : ख्रिस गेल

Patil_p

विंडीज संघाला न्यूझीलंडमध्ये सराव करण्यास परवानगी

Patil_p

एफसी गोवाची आज सलामीची लढत बेंगलोरशी फातोडर्य़ात

Patil_p

बार्सिलोनाच्या विजयात सुआरेझचा एकमेव गोल

Patil_p
error: Content is protected !!