तरुण भारत

दोन गोलांच्या पिछाडीनंतर नॉर्थईस्टने ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

पहिल्या सत्रातील दोन गोलांच्या पिछाडीनंतर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या बळावर केरळ ब्लास्टर्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर काल हा आयएसएल स्पर्धेतील सामना खेळविण्यात आला.

केरळ ब्लास्टर्ससाठी सर्जिओ सिदोंचा आणि गॅरी हूपरने तर नॉर्थईस्ट युनायटेडसाठी क्वेसी अप्पिहा आणि इद्रिसा सिलाने प्रत्येकी एक गोल नोंदविला. या बरोबरीने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. केरळ ब्लास्टर्स आणि नॉर्थईस्टचे आता दोन सामन्यांतून प्रत्येकी एक गुण झाला आहे.

केरळ ब्लास्टर्सचे सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळावर वर्चस्व आढळुन आले. नॉर्थईस्ट युनायटेडला सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला राकेश प्रधान आणि फेडेरिको गाल्लेगो यानी रचलेल्या चालीवर प्रतिस्पर्धी संघातील बचावळीतील धोकादायक खेळीमुळे डी कक्षेबाहेर फ्रिकीक मिळाली होती, मात्र सदोष फटक्यामुळे ती बाहेर गेली.

सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने गोल करून आघाडी मिळविली. सित्यासेन सिंगने घेतलेल्या फ्रिकीकवर स्ट्रायकर सर्जिओ सिडोंचाने हेडरने नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक सुभाषिश रॉय चौधरीला चकविले आणि चेंडूला गोलमध्ये टाकले. त्यानंतर 21व्या मिनिटाला गॅरी हूपरने रोहितकुमारच्या पासवर हाणलेला जबरदस्त फटका प्रतिस्पर्धी बचावपटू डायलन फॉक्सने क्लियर केला. दुसऱयाच मिनिटाला गॅरीने केरळसाठी दुसरा गोल नोंदविण्याची संधी समोर खुला गोल असताना बाहेर मारून वाया घालविली. पहिल्या ड्रिंक्स ब्रेकच्या ठोक्याला नॉर्थईस्ट युनायटेडच्या राकेश प्रधानही गोल बाद करण्यात चुकला.

मध्यंतराच्या ठोक्याला केरळ ब्लास्टर्सने मिळालेल्या पॅनल्टीवर गॅरी हूपरने गोल करून आघाडी 2-0 अशी वाढविली. दुसऱया सत्रात नॉर्थईस्टने आक्रमक खेळ केला. प्रथम एक गोल केला व नंतर पॅनल्टीवर गोल करण्याची संधीही गमविली. 51व्या मिनिटाला क्वेसी अप्पिहाने गोल करून नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी एक गोलने कमी केली. सामन्याच्या 65व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडच्या क्वेसी अप्पिहाने मिळालेल्या पॅनल्टीवर गोल करण्याची नामी संधी गमविली. गोल बाद करण्याचे क्वेसी नॉर्थईस्टचे प्रयत्न अखेर सामन्याच्या 90व्या मिनिटाला फळास आले. गुरजिंदरच्या पासवर इद्रिसा सिलाने प्रथम दोन बचावपटूंना व नंतर केरळचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले आणि बरोबरी साधली.

Related Stories

महाराष्ट्र खो-खो संघटनेची मुख्यमंत्री निधीला देणगी

Patil_p

भारतीय खेळाडूंनी केला कसोटीचा सराव

Patil_p

रियल काश्मिर फुटबॉल क्लबकडून मदत

Patil_p

2 नव्या आयपीएल संघांना 24 डिसेंबरला मंजुरी शक्य

Patil_p

भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर मान्यता

Patil_p

रैनासाठी यापुढे चेन्नई फ्रँचाय झीचे दरवाजे बंद?

Patil_p
error: Content is protected !!