तरुण भारत

दिल्ली : कोरोना रुग्णांनी ओलांडला 5.51 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 5 हजार 475 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 91 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 51 हजार 262 वर पोहचली आहे. यामधील 38,734 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 5 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त! 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 4,937 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 03 हजार 717 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8,818 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 60 लाख 39 हजार 703 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 28,897 आरटीपीसीआर टेस्ट आणि 34,369 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 8.65 % आहे. तर 5156 झोन आणि 373 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

चुरशीच्या संग्रामात रालोआला आघाडी

Patil_p

1993 मध्ये निदर्शने, 27 वर्षांनी आरोपपत्र

Amit Kulkarni

भारतात कोरोना रुग्णसंख्या मंदावतेय

datta jadhav

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त

datta jadhav

केंद्रीय स्तरावर कोरोना लसीची खरेदी

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 15 हजार पार

pradnya p
error: Content is protected !!