तरुण भारत

मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ होणारच!

पंतप्रधानांच्या निर्देशांमधून स्पष्ट संकेत

नवी दिल्ली

 मुंबई-अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा विरोध असतानाही आता रद्द केला जाणार नाही हे निश्चित झाले आहे. कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारसोबतचे वाद सोडविले जात नसतील तर निदान गुजरातच्या हद्दीतील काम तरी पूर्ण करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या आहेत.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसले तरी प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱयांसोबतच्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. बुलेट टेन प्रकल्पाच्या बांधकामपूर्व कामाच्या संथ गतीवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने गुजरातमधील 349 किमीपैकी 325 किमीवरील कामासाठीच्या कंत्राटासाठीची निवेदने मागवली आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱया गुजरातमधील एकूण जमिनीपैकी जवळपास 85 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झालेले आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण 25 टक्क्मयांहून कमी आहे.

Related Stories

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारताच्या वाटेवर ?

Patil_p

दोन सप्ताहांमध्ये लसीकरणाला प्रारंभ

Patil_p

देशात 24 तासांमध्ये 1463 नवे बाधित

Patil_p

पंजाबमध्ये 200 किलो अंमली पदार्थ जप्त

Patil_p

देशात 20,021 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

राज्यात कोरोनाचा कहर

Patil_p
error: Content is protected !!