तरुण भारत

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने पक्षाचे कोषाध्यक्षपद रिक्त झाले असून, नवीन कोषाध्यक्षपदासाठी चार दिग्गजांची नावे समोर आली आहेत. काही महिन्यातच पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे पक्षाला लवकरच नवीन खजिनदार नेमावा लागणार आहे. 

Advertisements

कोषाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत चार विश्वासू आणि दिग्गज नेत्यांची नावे समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि मिलिंद देवरा आघाडीवर आहेत. मात्र, गेहलोत राजस्थानची सत्ता सोडणार नाहीत, अशी शक्यता आहे. 

कमलनाथ किंवा वेणुगोपाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. मात्र, मध्यप्रदेशात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांनी कमलनाथ यांच्या सहभागाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केसी वेणुगोपाल हे सध्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत. ते राहुल गांधींचे विश्वासू असल्याने पक्ष ही जबाबदारी त्यांच्यावरही सोपवू शकतो. 

Related Stories

इक्विटी म्युच्युअल फंडात 3 हजार कोटीची भर

Patil_p

आफ्रिका-लॅटिन अमेरिका : नवी कोरोना केंद्रे

Patil_p

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

एनपीआर बैठकीला ममतांचा नकार

Patil_p

आई अखेर आईच असते…

Patil_p

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!