तरुण भारत

रत्नागिरी : कोकण मार्गावर २ डिसेंबरपासून ‘वास्को-पाटणा’ पुन्हा धावणार

प्रतिनिधी / खेड

कोकण मार्गावर २१ ते ३१ ऑक्टोबर याकालावधीत चालवण्यात आलेल्या वास्को-द-गामा – पाटणा सुपरफास्ट साप्ताहिक गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही साप्ताहिक गाडी २ ते ३० डिसेंबर याकालावधीत कोकण मार्गावर धावणार असल्याने विशेषतः पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या वास्को द गामा पाटणा साप्ताहिक गाडीमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. यापार्श्वभूमीवर वास्को द गामा-पाटणा सुपरफास्ट गाडीच्या सेवा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. २० डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून केंद्र व राज्य सरकारच्या कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन रेल्वे स्थानकांवर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२ ते ३० डिसेंबर याकालावधीत दर बुधवार धावणारी ही गाडी वास्को द गामा येथून सायं ७.०५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १२.१० वाजता पाटणा येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर रविवारी धावेल. पाटणा येथून दुपारी २ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ८.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहचेल. कोकण मार्गावर पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीरोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आली आहेत.

Related Stories

मोर्ले गावात पुन्हा आला टस्कर

NIKHIL_N

बावनदीत पोहायला गेलेले दोघे तरुण बुडाले

Patil_p

नव्या शिक्षण धोरणाविरोधात आंदोलन उभारणार

NIKHIL_N

आयनॉक्स जवळील भाजीपाला विक्रेते आजपासून आपल्या मुळ ठिकाणी

Omkar B

मधलामाज मांद्रेतील स्वयंघाषित लॉकडाऊन यशस्वी

Omkar B

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Patil_p
error: Content is protected !!