तरुण भारत

गढूळ पाण्याच्या समस्येने सार्वजनिक पाणीपुरवठा खाते खडबडून जागे

वाळपई /प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयाच्या नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात शेळपे बुद्रुक गावांमध्ये गढूळ पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याची बातमी दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Advertisements

 आज सकाळी वाळपई पाणीपुरवठा अधिकाऱयांनी सदर गावांमध्ये धाव घेऊन शुध्द पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला. त्यामुळे यंत्रणा बदलल्याने या गावातील नागरिकांच्या नळांना आता स्वच्छ पाणी येण्यास प्रारंभ झालेला आहे. गेल्या चार महिन्यापासून या संदर्भातील समस्या असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्षपणा करणाऱया अधिकाऱयांनी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्यानंतर उपाययोजना करण्यावर भर दिला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता शौचालयाची समस्या  गावांमध्ये प्रलंबित राहिलेली आहे.

अधिकाऱयांची धावपळ.

दरम्यान सदर गावांमध्ये नागरिकांच्या जणांना गढूळ पाणी येत आहे .त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना नजीक असलेल्या नदीवरील पाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे .यामुळे दोन वर्षापूर्वी सदर पाण्याचा वापर होत असल्यामुळे गावांमध्ये रोगराई पसरली होती. अनेक नागरिकांना ताप व जुलाब झाला होता. यामुळे सरकारची संबंधित यंत्रणा  त्यावेळीवेळी खडबडून जागी झाली होती. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी गावाच्या नजीक असलेल्या एका कूपनलिकेवर यंत्रणा बसवून त्याच्या माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी बसवलेली यंत्रणा सध्यातरी काम करीत नाही व नागरिकांना गढूळ स्वरूपाच्या पाणीपुरवठा मंडळाच्या माध्यमातून होत असल्याची बाब चार महिन्यापूर्वी उघडकीस आली होती .अनेकवेळा तक्रारी करून सुद्धा त्याचा कोणताही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे काही नागरिकांनी पत्रकारांशी संवाद साधून या संदर्भाची समस्या त्यांच्यासोबत मांडल्यानंतर दैनिक तरुण भारत ने ही समस्या उचलून धरली व वृत्त चांगल्याप्रकारे प्रसिद्ध झाले होते. यामुळे वाळपई पाणीपुरवठा अधिकाऱयांनी सदर गावांमध्ये धाव घेऊन एकूण परिस्थितीची जाणीव करुन घेण्याचा प्रयत्न केला. तात्काळ उपाययोजना करण्यावर भर देण्यात आली.

गढूळ पाणी पुरवठा यंत्रणा बदलली.

दरम्यान वाळपई पाणीपुरवठा सहाय्यक अभियंता सोमा नाईक कनि÷ अभियंता गणेश गावकर यांनी इतर अधिकारी यांच्यासमवेत आज गावांमध्ये धाव घेऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. सुरुवातीच्या एक तासात नागरिकांच्या जणांना पूर्णपणे गढूळ स्वरूपाचे पाणी येत आहे. त्या संदर्भाची जाणीव व तपासणी करण्यात आल्यानंतर आवश्यक स्वरूपाची यंत्रणा बदलून टाकण्यात आलेली आहे. यामुळे संध्याकाळच्या सत्रात नागरिकांच्या नळांना आता शुद्ध पाणीपुरवठा होऊ लागलेला आहे. सोमा नाईक यांनी प्रत्यक्षपणे जातीने हजर राहून ही यंत्रणा बदलण्यावर भर दिली. त्यानंतर त्यांनी अनेक घरांमध्ये जाऊन पाणीपुरवठा कशाप्रकारे होत आहे यासंदर्भाची तपासणी केली आता कोणत्याही प्रकारची समस्या या गावांमध्ये निर्माण होणार नसून नागरिकांच्या नळांना स्वच्छ पाणीपुरवठा होणार असल्याचे  प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

यदाकदाचित पुन्हा गढूळ स्वरूपाच्या पाणीपुरवठा झाल्यास त्या संदर्भाच्या उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे सोमा नाईक यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना गढूळ पाण्याच्या तक्रारी पुन्हा एकदा कार्यालयाकडे करता येणार नाहीत .यासंदर्भात पाणीपुरवठा कार्यालयाचे अधिकारी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मीटर बायपास करून पाण्याची चोरी.

दरम्यान या गावातील काही नागरिक पाण्याचे मीटर बायपास करून पाण्याची चोरी करीत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे. आज काही अधिकाऱयांनी गावातील अनेक जणांची तपासणी केली असता काही जणांनी मीटर काढून परस्पररित्या पाण्याची पाईपलाईन जोडलेली आहे. यामुळे पाण्याची चोरी होत असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. या यासंदर्भाचे सर्वेक्षण लवकरच हाती घेण्यात येणार असून अशा ग्राहकावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. सध्या एका बाजूने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे व दुसऱया बाजूने अशा प्रकारे पाण्याची चोरी होत असेल तर सरकारचा महसूल बुडला जाणार आहे  असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. ज्यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे त्यांनी ताबडतोब मीटर खराब झाल्यास तो बदलून घ्यावा मात्र पाण्याची चोरी करू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Related Stories

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती पोलीस सुरक्षा अधिक कडक करणार

Patil_p

गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणीच्या नियमांत बदल

Rohan_P

गोव्यातून गेलेले 80 कामगार पुन्हा गोव्यात

Omkar B

विर्डी सखळीत नवीन 5 रूग्ण, एकूण रूग्णसंख्या 11.

Patil_p

मनपाकडून मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई

Amit Kulkarni

चर्चेविना अर्थसंकल्प संमतीस विरोधकांचा विरोध

Omkar B
error: Content is protected !!