तरुण भारत

कर्नाटक बंदच्या निर्णयावर कन्नड संघटना ठाम

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कन्नड संघटनांनी ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान हा बंद हाणून पाडण्यास राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु कन्नड संघटना या निर्णयावर ठाम आहेत, असे वाटाळ नागराज यांनी म्हंटले आहे. कन्नड संघटनांनी आता मराठा समुदाय विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसह बळ्ळारी जिल्ह्याच्या विभाजनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कर्नाटक बंदची घोषणा ५ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

सरकारचा निर्णय एकतर्फी
नागराज यांनी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेत मराठा समुदाय विकास महामंडळ स्थापनेशिवाय बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे निर्णय घेताना राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावणे आवश्यक होते. परंतु असे निर्णय केवळ राजकीय स्वार्थासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्णयांना कन्नड संघटनांचा तीव्र विरोध आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचा एल्गार

Sumit Tambekar

कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांचे भाजपमधील मतभेदांबद्दल मौन

Abhijeet Shinde

सरकारी शिक्षक कोरोना कामात व्यस्त

Abhijeet Shinde

राज्यातही मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता

Amit Kulkarni

निवृत्त पोलिसांनाही मिळणार ओळखपत्रे

Patil_p
error: Content is protected !!