तरुण भारत

कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका दिला आहे. महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. तसेच कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • कंगना म्हणाली… हा लोकशाहीचा विजय! 


कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती सरकार विरोधात उभी राहते आणि विजय मिळवते त्यावेळी तो विजय त्या व्यक्तिचा नसून लोकशाहीचा विजय असतो. आपल्या सर्वांचे आभार ज्यांनी मला हिंमत दिली. त्या लोकांचेही आभार जे माझ्या तुटलेल्या स्वप्नावर हसले. याचे एकमेव कारण आहे की, आपण एक खलनायकाची भूमिका करता, त्यामुळे मी एक हिरो असू शकते, असेही तिने म्हटले आहे. 


मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबरला बेकायदेशीर बांधकामाचे कारण देत अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर ही कारवाई थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरम्यान कंगनाने अनेक घोटाळे केल्याचा आरोपही महापालिकेने केला होता. या संपूर्ण वादात कंगना आणि शिवसेना यांच्यातही आरोप आणि प्रत्यारोप झाले. दरम्यान, कंगनाने मुंबई महापालिकेला नोटीस बजावत आपल्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या नुकसानीची भरपाई म्हणून 2 कोटींचीही मागणी केली होती. यावर बीएमसीने उत्तर देत कंगनाने बेकायदेशीरित्या कार्यालय उभारल्याचे म्हटले होते.

Related Stories

या आठवडय़ात

Patil_p

रियाच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

pradnya p

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

Patil_p

बालिका वधू हा माझ्यासाठी जीवन बदलणारा अनुभव होता: अविका गोर

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर

pradnya p

नव्याकोऱया चित्रपटात दिसणार शीतल अहिरराव

Patil_p
error: Content is protected !!