तरुण भारत

फलटण पालिका

वार्ताहार / बिबी

फलटण शहरातील शिवाजीनगर परिसराचे ’छत्रपती शिवाजी महाराजनगर’ नामकरण करण्याचा ठराव पालिकेच्या सभेत तत्काळ मंजूर केला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे नगराध्यक्षांकडे केली आहे.                              

Advertisements

फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथील यरशवंतराव चव्हाण हायस्कूल ते महाराजा मंगल कार्यालय या रिंगरोडच्या डाव्या बाजूच्या परिसरास तीस वर्षापूर्वी शिवाजी नगर असे नामकरण करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. मात्र, आता संपूर्ण देशात अनेक संस्थांचे  नव्याने नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे पार्श्वभूमीवर फलटण शहरातील परिसराचे देखील ’ छत्रपती शिवाजी महाराज नगर ’ नामकरण करण्याचा ठराव पालिकेने केला पाहिजे. त्याच बरोबर त्या परिसराच्या सर्व प्रवेश मार्गावर भव्य आणि आकर्षक फलक देखील उभारले गेले पाहिजेत, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

Related Stories

साताऱ्यातील जुगार अड्डयावर छापा

datta jadhav

राज्य शासनाने चांदी उद्योग चालू करण्यास सवलत द्यावी

Abhijeet Shinde

सातारा : पंख फुटलेली मुलगी समाजमन शहाणे करेल

Abhijeet Shinde

सातारात जिल्हा परिषदेत बदल्याचे सत्र सुरू

Abhijeet Shinde

वारणेच्या बंधारे दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

Abhijeet Shinde

शिकारीचं अडकले जाळ्यात

Patil_p
error: Content is protected !!