तरुण भारत

शाहू क्रीडा संकुल परिसरात अस्वच्छता

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात शाहू क्रीडा संकुलाच्या व्यापारी गाळ्याच्या बाहेर कोप्रयात कच्रयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पालिकेकडून कचरा उचलला जात नाही, असा आरोप वाहतूक संघटनेचे नेते प्रकाश गवळी यांनी केला आहे.

क्रीडा संकुलात दीडशे व्यापारी गाळे आहेत.या गाळ्याच्या कोप्रयात कचरा साठला जातो.हा कचरा पालिकेकडून नियमित उचलला जात नाही.विशेष म्हणजे मोकळ्या जागेत कच्रयाचे आगार बनले आहे.याबाबत प्रकाश गवळी म्हणाले,शाहू स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या आवारात150गाळे धारक आहेत.ते दरवर्षी लाखो रुपयांचा कर नगरपालिकेला देत असतात. परंतु पालिकेची स्वच्छतेची जबाबदारी असताना कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. कचराची गाडी येते आणि कचरा न उचलता निघून जाते. याचा अर्थ काय?, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार करोडो रुपये पालिकेला देत आहे. तो पैसा कोठे खर्च होतो,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

नो पार्किंग झोन परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

Patil_p

अखेर 4 जणांची गुलामगिरितुन मुक्तता

Patil_p

उडतारेनजीक ट्रकने धडक दिल्याने बस क्लिनर जखमी

triratna

किराणा दुकानाला आग; 15 लाखांचे नुकसान

Patil_p

पालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथि साजरी

Patil_p

मद्यधुंद कंटेनरचालकाचा महामार्गावर थरार, चौघे जखमी

triratna
error: Content is protected !!