तरुण भारत

कुंटणखाना महिला चालकासह साथीदार गजाआड

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराच्या मध्यवस्तीत कुंटणखाना चालवणाऱया व एका गंभीर गुन्हय़ानंतर फरारी असलेल्या सरिता बजरंग लाडी (रा. तोफखाना, सातारा) हिला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात अटक केली. तिला न्यायालयासमोर उभे केले असता दि. 28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यावेळी तिचा साथीदार आकाश शनि कांबळे (रा. दुर्गापेठ, सातारा) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सरिता लाडी हिच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. 19 जून 2020 रोजी आयपीसी कलम 363, 366, 376 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर लाडी व कांबळे फरार झाले होते. वरिष्ठ अधिकाऱयांना त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांचे कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. दि. 22 रोजी उपनिरीक्षक कदम यांच्या पथकास गुह्यातील मुख्य सुत्रधार ही पुणे येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने मिळालेल्या बातमीची खात्री करुन दि. 23 रोजी पुणे येथे जावून नियोजनबद्धरित्या सापळा लावला व मुख्य सुत्रधार सरिता बजरंग लाडी हिला तिच्या राहत्या फ्लॅटवर छापा घालून ताब्यात घेतले. तिच्याकडून गुह्यातील अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करुन दुसऱया दिवशी तिचा गुह्यातील दुसरा साथीदार आकाश शनि कांबळे याला अटक केली आहे. त्यांनी गुह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी अशी दोन वाहने जप्त केलेली आहेत.

या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम, सहाय्यक फौजदार विश्वास कडव, हवालदार वाघमळे, शेवाळे, पोलीस नाईक भिसे, चव्हाण, साबळे, घाडगे, कचरे, धुमाळ, भोंग यांनी सहभाग घेतला.

Related Stories

कासची उंची वाढली… आमच्या रस्त्याचं काय?

Patil_p

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Abhijeet Shinde

औंध परीसरात अवकाळीच्या तडाख्याने ज्वारी भूईसपाट

Sumit Tambekar

होळी, धुलिवंदन शांततेत साजरी

Patil_p

अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला साताऱयातून मिळावा

Patil_p

अन ते चोरी झालेले लोखंडी प्रवेशद्वार सापडले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!