तरुण भारत

भाजपचे रविवारी पदवीधर आणि शिक्षक मतदार महासंपर्क अभियान

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ येत्या रविवारी (29 नोव्हेंबर) पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहा हजार कार्यकर्ते ‘पदवीधर आणि शिक्षक मतदार महासंपर्क अभियान’ राबविणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख राजेश पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.


पांडे म्हणाले, ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील या अभियानात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, पक्षाच्या पदाधिकार्‍यांपासून बूथ प्रमुखांपर्यंतचे दहा हजार कार्यकर्ते पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी घरोघर जाऊन प्रत्यक्ष संपर्क करणार असून जाहीरनामा, परिचय पत्रक, मतदार स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे.


पांडे पुढे म्हणाले, ‘प्रत्येकी एक हजार मतदारांमागे एक प्रमुख कार्यकर्ता याप्रमाणे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाचही जिल्ह्यातील रचना पूर्ण करण्यात आली आहे. पारंपरिक प्रचार साधनांबरोबर मोबाईल ऍप, आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान स्लिपांचे वाटप करण्यात येत आहे. एसएमएस, प्रत्यक्ष ङ्गोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी प्रचार करण्यात आला आहे. संस्थात्मक पातळीवर मतदानाची रचना पूर्ण करण्यात आली आहे.


सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले आहे. प्रदेशाध्यक्षांपासून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या पदवीधर मतदार महासंपर्क अभियानातून देशमुख यांचा विजय सुनिश्‍चित होईल असा विश्‍वास पांडे यांनी व्यक्त केला आहे.  
 

Related Stories

राममंदिर हे स्वातंत्र्य मंदिर : देवेंद्र फडणवीस

datta jadhav

सोलापूर डेपोतून तब्बल 73 दिवसांनी एसटी बस धावणार

triratna

जम्बो कोविड रुग्णालयातील सुविधांचे काम 7 दिवसात पूर्ण करा : राजेश टोपे

pradnya p

सोलापुरात आज नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; रुग्णांची संख्या 390

triratna

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हजारी पार

triratna

वीजग्राहकांच्या सहकार्याने आर्थिक संकटावर मात करण्याची महावितरणमध्ये क्षमता

pradnya p
error: Content is protected !!