तरुण भारत

पुणे विभागातील 5 लाख 1 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे विभागातील 5 लाख 1 हजार 266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 30  हजार 983 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 14  हजार 797  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 39 हजार 562 रुग्णांपैकी 3 लाख 20 हजार 418 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 10  हजार 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 261  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.43  टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.36 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 460 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 30 हजार 983 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या …

pradnya p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी साधलेला संवाद..

tarunbharat

निसर्ग चक्रिवादळात नगर जिल्ह्यातील ६३२ हेक्‍टरचे नुकसान

datta jadhav

सोलापूर : दुकान मालकांची कोरोना चाचणी आदेश रद्द करा

triratna

खासगी कंपन्या रॉकेट, उपग्रह तयार करतील : के. सिवन

Shankar_P
error: Content is protected !!