तरुण भारत

जमत नसेल तर सत्ता सोडा,चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

प्रतिनिधी / कोल्हापूर

जमत नसेल तर सत्ता सोडा, असा थेट सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. आघाडी सरकारला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने ते कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. सरकार पूर्णपणे गोंधळलेले, संवेदनशीलता नसलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळ, परतीच्या पावसात शेतकऱयांचे नुकसान झाले. अशा वेळी शेतकऱयांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र, केवळ केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील मागच्या सरकारकडे बोट करण्याचे काम सुरू आहे. त्यांना झेपत नसेल तर सत्ता सोडावी, असा थेट सल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी त्यांनी एखादे घर विकत घेतल्यानंतर त्याच्या जुन्या मालकाला दोष न देता आपणच त्या घराची डागडुजी करायची असते, हे यांना कोण सांगणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Advertisements

कोरोना काळात सरकार अपयशी

महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, हे सरकार पूर्णपणे गोंधळलेले आहे. शिवाय कोरोना काळातसुद्धा सरकार अपयशी ठरले आहे. देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येच्या तुलनेत एकटÎा महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाची रुग्ण संख्यासुद्धा सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूणच हे मोठे अपयश म्हणावे लागेल, अशी टिका त्यांनी केली.

Related Stories

खेबवडे येथे भिंत कोसळून दोन दुभती जनावरे गंभीर जखमी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाचे आठ बळी, २३६ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सातार्डे येथे महिला पोलीस पाटीलला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथे भरदिवसा वृद्ध महिलेला मारहाण करीत पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विनापरवाना भिशी चालवून पावणेचार लाखांची फसवणुक; गडमुडशिंगीतील तरुणास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!