तरुण भारत

पंपहाऊससाठी सपाटीकरणाच्या कामास शेतकऱयांचा विरोध

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतर्गत रुक्मिणीनगरात उभारण्यात येणार पंपहाऊस

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

 शेतकऱयांना नुकसान भरपाई न देताच रुक्मिणीनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी शेतकऱयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जागेचा कब्जा घेऊन सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी याला विरोध करून सदर काम बंद पाडले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीस शेतकऱयांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र विरोध झुगारून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. हलगा परिसरातील शेतकऱयांची 19 एकर शेतजमीन संपादित करून त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. पण सदर प्रकल्प उभारणीस शेतकऱयांनी विरोध करून कामकाज बंद पाडले होते. मात्र पोलीस संरक्षणात सदर काम सुरू करण्यात आले आहे. जागेचा ताबा घेऊन संपूर्ण जागेभोवती तारेचे कुंपन घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रुक्मिणीनगर येथील जागेच्या सपाटीकरणाचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले आहे. महांतेशनगर-श्रीनगर परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ते अलारवाड क्रॉस येथे प्रकल्पात आणण्यात येणार आहे. याकरिता मोठी डेनेज वाहिनी घालण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रुक्मिणीनगर येथे पंप हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे. सदर पंप हाऊससाठी शेतकऱयांची पिकाऊ जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र या जागेची नुकसान भरपाई शेतकऱयांना अद्याप देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे भूसंपादन करण्यात येवू नये, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असताना रुक्मिणीनगर येथील जागेच्या सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी याला विरोध करून सदर काम बंद पाडले.

आता सपाटीकरणाचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात आले होते. याबाबतची माहिती शेतकऱयांना मिळताच शेतकऱयांनी धाव घेऊन अधिकाऱयांकडे विचारणा केली असता काम थांबविण्यात आले. पण शुक्रवारी सकाळी पुन्हा काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांनी पुन्हा जाऊन अधिकाऱयांना काम थांबविण्याची सूचना केली. सदर भूसंपादनाबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच नुकसान भरपाई घेण्यात आलेली नाही. मात्र भूसंपादनाच्या मोबदल्यात न्यायालयात नुकसान भरपाई जमा केली असल्याचे शेतकऱयांना अधिकाऱयांनी सांगितले. मात्र शेतकऱयांनी काम थांबविण्याची मागणी केली. अखेर शेतकऱयांच्या विरोधामुळे सपाटीकरणाचे काम थांबविण्यात आले.

Related Stories

मार्गशिर्षातील लक्ष्मी व्रताला आजपासून प्रारंभ

Omkar B

पहिला मार्गशीर्ष गुरुवार भक्तिमय वातावरणात

Patil_p

महामोर्चा-काळय़ादिनी सायकल फेरी होणारच

Amit Kulkarni

माधुरी शानभाग यांच्याकडून सरस्वती वाचनालयाला पुस्तके भेट

Omkar B

पाटीलगल्लीतील गळतीकडे पाणीपुरवठा मंडळाचा कानाडोळा

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवान्याचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!