तरुण भारत

निवृत्त वनाधिकारी आप्पोजी पाटील यांना मुख्यमंत्री पदक

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर तालुक्मयातील हिडकलसारख्या ग्रामीण भागात राहून शिक्षण घेऊन नवविभागात आप्पोजी यल्लाप्पा पाटील यांनी नोकरी केली. वनाधिकारी म्हणून त्यांनी 38 वर्षे उत्तम सेवा बजावली. त्यानंतर ते अलीकडेच निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक बहाल करण्यात आले  आहे.

Advertisements

आप्पोजी पाटील हे एका शेतकरी आणि गरीब कुटुंबात जन्मले. त्यांनी गरिबीवर मात करत शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात असताना वनविभागात रक्षक म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. त्यानंतर वेगवेगळय़ा परीक्षा देत वनाधिकाऱयांपर्यंत मजल मारली. 38 वर्षे कार्यतत्पर आणि दक्षतेने त्यांनी सेवा बजावली. त्याबद्दल त्यांना हे मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे खानापूर तालुक्मयातून अभिनंदन होत आहे.

Related Stories

सराफी व्यावसायिकाने केले ऍसिड प्राशन

Omkar B

भांदूर गल्ली मरगाई ग्रुपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

Amit Kulkarni

मंगळवारी तब्बल 4,270 रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

पैसे मिळण्याच्या अफवेने पोस्टात पुन्हा गर्दी

Patil_p

बसमार्गात बदल; प्रवाशांची हेळसांड

Amit Kulkarni

पीडीओ बनल्या मनपाच्या उपायुक्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!