तरुण भारत

बटाटा बियाणे दरात वाढ : शेतकरी चिंतातूर

उन्हाळी बटाटा लागवड कमी होण्याची शक्यता

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

सुगी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून रब्बी हंगामातील कडधान्य पेरणी बरोबरच इतर पिकांच्या लागवडीसाठी तयारी सुरू आहे. यामध्ये बटाटा उन्हाळी बटाटा बियाणांची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. यंदा खरीप हंगामातील बटाटा पीक अतिपावसामुळे व खराब बियाणांमुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बटाटा उत्पादक शेतकऱयांना याचा फटका बसला आहे. त्यातच आता उन्हाळी बटाटा बियाणांचा दर आवाक्मयाबाहेर गेल्याने बटाटा बियाणाची खरेदी करून लागवड कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे यंदा लागवड कमी होण्याची शक्मयता आहे.

 तालुक्मयातील पश्चिम व उत्तर भागात मोठय़ा प्रमाणात उन्हाळी बटाटा लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी बटाटा बियाणे एपीएमसीमधील अडत क्यापाऱयांकडून घेतली जातात. मात्र सध्या बटाटा बियाणांचा दर आवाक्मयाबाहेर गेल्याने बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. यंदा खरीप हंगामातील बटाटा उत्पादनात कमालीचे घट झाली होती. एपीएमसीमध्ये बटाटा आवक देखील कमी झाल्याने याचा परिणाम बटाटा बियाणांच्या दरावर झाला आहे. आता बटाटा बियाणांचा दर अधिक झाल्याने बटाटा उत्पादक अडचणीत आले आहेत. परिणामी यंदा उन्हाळी बटाटा लागवड कमी होणार आहे.

उन्हाळी बटाटा बियाणांचा दर 4 हजार हून पुढे गेल्याने तो विकत घेऊन कसा लावाला या चिंतेत बटाटा उत्पादक आहेत. आधीच खरीप हंगामील बटाटा पीक वाया गेले आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक हतबल झाले आहेत. उन्हाळी बटाटा पिकावर उरल्या सरल्या आशा होत्या. मात्र उन्हाळी बटाटा बियाणांचा दर आवाक्मयाबाहेर वाढल्याने बटाटा बियाणे कसे खरेदी करावे, या चिंतेत शेतकरी आहेत.

तालुक्मयात रब्बी हंगामात भाजीपाल्याबरोबर बटाटा बियाणांची मोठय़ा प्रमाणात लावगड केली जाते. दरवषी बटाटा बियाणाचे दर 1500 ते 2000 दरम्यान  असायचा. मात्र यंदा बटाटा बियाणांचा दर तब्बल चार हजार अधिक असल्याने बटाटा लागवडीवर याचा परिणाम होणार आहे.

तालुक्मयातील गोजगा, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, मण्णूर, आंबेवाडी, बाची, तुरमुरी, कल्लहोळ, कोनेवाडी, कुदेमनी, कडोली, गुंजेनहट्टी, अलतगे, जाफरवाडी, काकती, होनगा, गौंडवाड, कंग्राळी खुर्द, बेळगुंदी, बाकनूर, सोनोली, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले, सावगाव, मंडोळी आदी भागात उन्हाळी बटाटय़ाची लागवड केली जाते.

Related Stories

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

जीवाचे रान; मग कसे राखणार कोरोनाचे भान!

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना न्यायालयाकडून दिलासा

Amit Kulkarni

कुद्रेमनी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

निपाणी तालुक्याचा राज्यात कर्तृत्वाचा झेंडा

Patil_p

पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

Patil_p
error: Content is protected !!