तरुण भारत

कणकुंबीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त

अबकारी खात्याची कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

गोवा येथून दारू आणून ती विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱया वाहनाला अडवून त्यामधील गोवा बनावटीची 1 लाख रुपये किमतीची दारू अबकारी खात्याच्या पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी अशोक सुरेश पाटील (वय 25, रा. ब्रम्हलिंग गल्ली, खादरवाडी) याला अटक करुन वाहनही जप्त करण्यात आले आहे.

अशोक हा गोवा येथून खानापूरकडे टाटा 407 क्रमांक केए 22 ए 6976 यामधून गोवा बनावट दारूची वाहतूक करत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली. अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ आणि उपायुक्त जयरामेगौडा, दक्षिण अबकारी विभागाचे उपअधीक्षक चन्नगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी पथकाने धाड घातली.

अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली यांनी आपल्या सहकाऱयांसह वाहन अडवून तपासणी केली. तसेच 324 बॉटल दारू व 24 बॉटल बिअर जप्त केली. अबकारी खात्याने एकूण 4 लाख 40 हजार 644 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अबकारी निरीक्षक एस. एम. पुजार, कणकुंबी तपास ठाणा उपनिरीक्षक चालुक्मय, अबकारी रक्षक सुनील पाटील, एम. एम. कटगण्णावर, बी. एस. अट्टीगल यांनी भाग घेतला होता.

Related Stories

सेल्फी काढताना ब्रिजवरून पडून युवक-युवती ठार

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचार: आरएएफ, केएसआरपी आणि बेंगळूर पोलिसांनी काढला रूट मार्च

triratna

प्रतिमा कुतिन्होच्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p

दिवाळी पाडव्यामुळे कोटय़वधीची उलाढाल

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथील दसरोत्सव साधेपणाने

Patil_p

बाजारात रानमेवा दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!