तरुण भारत

मनोरंजनाची माध्यमे जबाबदारीने हाताळायल्या हवीत!

अभिनेते, दिग्दर्शक निरज शिरवईकर यांचे मत

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

प्रेक्षकांना मनोरंजन आवडते हे खरे असले तरी त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे. त्यामुळे चित्रपट, नाटक, मालिका ही मनोरंजनाची माध्यमे जबाबदारीने हाताळली पाहिजेत. कारण माणसे फक्त वाईटच किंवा फक्त चांगली असूच शकत नाहीत. तर ती या दोन्हींचे मिश्रण असतात. हे सुद्धा निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे मत अभिनेते, दिग्दर्शक निरज शिरवईकर यांनी व्यक्त केले.

निरज हे बरीच वर्षे बेळगावला होते. बाप्पा शिरवईकर यांच्या भावाचे ते नातू आहेत. त्यांच्या ‘आमने सामने’ नाटकाला नुकताच ‘झी’ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटय़परिषद बेळगावतर्फे अध्यक्षा डॉ. संध्या देशपांडे यांनी परिषदेच्या कार्यकारिणी समवेत त्यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, आमने सामने हे नाटक लग्न संस्थेला प्रश्न विचारू पाहते. लग्न न झाल्याने ‘लिव्ह ईन’मध्ये राहणारे आपले लग्न झाल्याचे सांगून घर मिळवितात आणि तेथून प्रश्न निर्माण होतात. घर मालकाला या जोडप्यांनी खोटे सांगितले आहे हे कळते आणि नाटय़ सुरू होते. लग्न, लिव्ह ईन, वर्षानुवर्षे एकत्र राहूनही संसार केला की रेटला असे अनेक कंगोरे या नाटकाला आहेत.

नाटकाला प्रतिसाद कसा? या प्रश्नावर मार्केटिंग टीमने खूप उत्तम मार्केटिंग केले. वास्तविक नाटकाचा प्रेक्षक हा ज्ये÷ नागरिक असतो. परंतु या नाटकाला तरुणाईचाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांशी हे नाटक एक भावनिक नाते जोडते. त्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र कोरोनामुळे सध्या प्रयोग थांबले आहेत, असे ते म्हणाले.

गंभीर विषय हलका-फुलका करून मांडायला आवडते

गंभीर विषय गांभीर्याने मांडावा की हलका-फुलका करून मांडावा, या प्रश्नावर मला गंभीर विषय हलका-फुलका करून मांडायला आवडते. तथापि, गंभीर नाटकामध्ये मिश्कील प्रसंग किंवा वाक्मयांची पेरणी आवश्यकच आहे. पूर्ण गंभीर नाटक प्रेक्षकांना फारसे आवडते असे नाही, याकडे निरज यांनी लक्ष वेधले. बेळगावमध्ये संध्या देशपांडे यांच्या समवेत ‘नाटय़ांकुर’ अंतर्गत काम केले. घाशीराम कोतवालसह काही एकांकिका त्यांच्या समवेत केल्याचे निरज यांनी सांगितले.

‘एक शून्य तीन’ हे नाटक इंग्रजी कादंबरीवर आधारीत आहे. सुदीप मोडक बेळगावला आल्यावेळी कादंबरीबद्दल चर्चा केली होती. मी काहीकाळ दामू केंकरेंचा साहाय्यक म्हणून काम केले. सई परांजपे यांच्या कामाची पद्धत मी पाहिली होती. त्या अफाट पेपरवर्क करतात. हा अनुभव गाठीशी घेऊन नाटक करायचे ठरविले. या नाटकाचा सेट मीच डिझाईन करेन, असे सांगितले. अभिजित साठम यांचे आम्हाला सहकार्य लाभले आणि सुमीत राघवन सारखा नामवंत अभिनेता या नाटकात काम करण्यासाठी तयार झाला. त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांनी काढलेल्या पोस्टेड नोट्स याचे नवीन कलाकारांनी अनुकरण करावे, असे ते म्हणाले.

माणूस हा गुणदोषांचे मिश्रण असतो!

मालिकांबद्दल विचारता काही मालिका मी सुद्धा लिहिल्या आहेत. चॅनेलच्या मागणीसमोर दिग्दर्शक, लेखक यांना फारसे स्वातंत्र्य मिळतेच असे नाही. वैयक्तिकरित्या मला माणूस फक्त चांगला किंवा वाईट असा नसतो. तर तो गुणदोषांचे मिश्रण असतो, असे वाटते. म्हणूनच माझी पात्रे एकांगी किंवा एकसुरी नसतात. माझ्या पात्रांबद्दल, भले तो खलनायक असेल त्याबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटते, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व माध्यमातील विनोदाचा दर्जा खालावतो आहे. खरं म्हणजे जे वास्तव नाही ते ‘फार्स’मध्ये सादर करायला हवे. मात्र त्यातून काही माहिती किंवा संदेश लेखकाला सांगता यायला हवा. केवळ प्रेक्षक हसतात (ईझी लाफ) म्हणून काहीही सादर करणे योग्य नाही. प्रश्न आहे तो जबाबदारीचा. ती प्रत्येकाने ओळखायला हवी, असे ते म्हणाले.

एकवेळ चित्रपटांना प्रतिसाद मिळेल. चार शो नंतर काही तरी पैसे मिळतील. पण नाटकासमोर मात्र खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नाटय़कलाकारांना या काळात तग धरून राहणे कठीण होत आहे. ऑनलाईनचा पर्याय निश्चितच आहे. परंतु समोर घडणाऱया नाटकाशी प्रेक्षक जसे स्वतःला जोडून घेतात तसे नाटकात होत नाही, असे ते म्हणाले.

प्रारंभी प्रा. संध्या देशपांडे यांनी स्वागत केले. मौसमी भातकांडे यांनी पुष्पगुच्छ दिला. श्रीधर कुलकर्णी यांनी निरज यांचा सत्कार केला. आनंद गाडगीळ यांनी आभार मानले.

Related Stories

रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Amit Kulkarni

घटप्रभा रेल्वे ओव्हरब्रिजचे काम संथगतीने

Patil_p

निपाणीत प्लास्टिक बंदीचे ‘तीनतेरा’

Patil_p

जिल्हय़ात आणखी दोघे कोरोनाबाधित

Patil_p

नियोजनाला कष्टाची जोड, दर्जेदार पिकांची लाभली साथ

Omkar B

रुद्राक्ष विक्री-भव्य प्रदर्शन

Patil_p
error: Content is protected !!