तरुण भारत

…अन् मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी/ बेळगाव

सतत गजबजलेल्या काँग्रेस रोडवर भरधाव वेगाने धावणाऱया स्वीप्ट कारचा टायर फुटून कार रस्त्यावरच उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. केवळ सुदैव म्हणून यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या घटनेमुळे भीतीबरोबरच मोठी खळबळ उडाली.

Advertisements

बेळगावहून उद्यमबागकडे स्वीप्ट कार भरधाव वेगाने चालली होती. यावेळी अचानक टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरच हे वाहन उलटले. अचानकपणे जोरदार आवाज आल्यामुळे पाठिमागून येणाऱया वाहनांनी सावधानता बाळगली आणि आपल्या वाहनांचा वेग कमी केला. त्यामुळे मागून येणाऱया वाहनांची या कारला सुदैवानेच धडक बसली नाही.

या घटनेनंतर दुसऱया बाजूने जाणाऱया वाहन चालकांना काय झाले हे समजलेच नाही. त्यामुळे अनेकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला घेवून थांबविली. त्यानंतर काही तरुणांनी तातडीने स्वीप्टकडे जावून त्यामधील चालकाला आणि इतरांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेमुळे सर्वांचेच श्वास काहीवेळ रोखले होते. केवळ रस्त्याच्या बाजूला किंवा झाडाला कारची धडक बसली नाही. म्हणूनच कारमधील सर्व जण बचावले. याचबरोबर इतर कोणत्याही वाहनाला त्याचा धक्का पोहोचला नाही. या घटनेची माहिती बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल होवून वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

दिल्ली, चेन्नई, मंगळूर विमानसेवा सुरू करा

Patil_p

न्यायालय आवाराचे गेट पुन्हा बंद

Amit Kulkarni

संगोळ्ळी रायण्णा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

Patil_p

जेएमएफसी आवारात पुन्हा वाहनांची गर्दी

Amit Kulkarni

बेळगाव शहरात 23 केंद्रांवर होणार उद्या टीईटी

Patil_p

दहावीचा आज विज्ञान पेपर

Patil_p
error: Content is protected !!