तरुण भारत

आली लग्नघटी समीप… वाजंत्रे बहु गलबला न करणे!

यंदा विवाह मुहुर्तांचे 84 दिवस, सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर्सचा अंतरपाट

सुशांत कुरंगी/ बेळगाव

Advertisements

2020 हे वर्ष कोरोनाच्या धास्तीत गेले. मंगलकार्यांच्या बाबतीत अनेकांच्या स्वप्नांचा भंगच या वर्षात झाला. विवाहवेदीवर चढण्याचे बेत आखणाऱयांसमोर एकच पर्याय होता… तुळशी विवाहापर्यंत प्रतिक्षेचा. आणि तो क्षण आता आला आहे. तुळशीचे लग्न झाले. आणि आता कोरोनामुळे अडकुन पडलेले विवाह होणार आहेत. यावषी नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाह मुहुर्तांचे 84 दिवस लगबगीचे असतात. अर्थात सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर्सचा अंतरपाट घेऊनच नव्या जीवनाच्या शपथा घ्याव्या लागतील.

दिवाळी संपली की, यंदा कर्तव्य आहे. असे म्हणणाऱयांची धावपळ सुरू होते. मंगल कार्यालये, भटजींचे बुकींग, बँडबाजा वाल्यांशी संपर्क साधणे, विवाह जथ्याची खरेदी याची धामधूम सुरू होते. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना थाटामाटात विवाह करता आले नाहीत. त्यामुळे तुळशी विवाह होताच आता त्यांची तयारी सुरू झाली आहे. यावषी एकूण 84 मुहूर्त असून त्यापैकी सर्वाधिक मे महिन्यात आहेत. या महिन्यात एकूण 15 मुहूर्त असल्यामुळे धामधूमही मोठी असणार आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. गरीब असो वा श्रीमंत, मुलगा असो वा मुलगी आपले लग्न थाटामाटात व्हावे ही इच्छा असते. परंतु यावषी कोरोनामुळे काही इच्छांना मात्र मुरड घालावी लागणार आहे. आपल्या सोयीनुसार विवाह मुहूर्त ठरविले जात असून, आप्ते÷ मंडळींचे नियोजन त्या प्रकारे केले जात आहे. मंगलकार्यालयाचे बुकींग होताच इतर तयारीला सुरूवात केली जात आहे. केटरर्स, डेकोरेटर्स यांच्या तारखांची जुळवाजुळव आतापासूनच केली जात आहे.

यंदा उपलब्ध असणाऱया मुहूर्तांची माहिती पंचांगानुसार उपलब्ध झाली आहे. या संदर्भात भटजी चित्तरंजन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आवश्यक ती माहिती दिली. यावषी मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत. गुरूवार पासुन 26 पासून तुळशी विवाहाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 27 पासून विवाह मुहूर्तांना सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी धुमधडाक्मयात शहर परिसरामध्ये लग्नाचे बार उडविण्यात आले.

 विवाह सोहळय़ाला 200 जणांचीच उपस्थिती

यावषी कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग महत्वाचे ठरत आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसार केवळ 200 व्यक्तींनाच विवाह सोहळय़ासाठी उपस्थित राहता येणार आहे. ज्या मंगलकार्यालयांची क्षमता 200 हून कमी असेल अशा ठिकाणी विवाह सोहळय़ांना निम्म्या लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे निवडक पाहुण्यांनाच लग्नासाठी आमंत्रण द्यावे लागणार आहे.

बॅंडबाजाला मिळाली परवानगी

लॉकडाऊन नंतर झालेल्या विवाह सोहळय़ांना बँडबाजाची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे बँडबाजा विनाच लग्न सोहळा उरकावा लागत होता. परंतु प्रशासनाच्या नव्या नियमावलीनुसार काही अटी व नियम लादून बँडबाजाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सनईच्या सुरांसोबतच आता बँडचा सुरही लग्नसमारंभांमध्ये ऐकावयास मिळणार आहे.

बाळासाहेब काकतकर (सेपेटरी- मराठा मंदिर कार्यालय)

कोरोनामुळे लग्न कार्यांवर अनेक निर्बंध आले आहे. तरी देखील नियमावली नुसार लग्न सराईला सुरूवात होत आहे. मराठा मंदिर येथे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीसाठी आतापर्यंत 43 लग्नांचे बुकींग करण्यात आले आहेत. प्रत्येक विवाह समारंभ झाल्यानंतर संपूर्ण मंगल कार्यालय सॅनिटाईझ करून घेतले जाणार आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसारच विवाह समारंभ करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

योगेश दोरकाडे (संचालक – आशिर्वाद मंगल कार्यालय)

मागील वषी राहिलेले तसेच नवीन विवाह समारंभ तुळशी विवाहानंतर सुरू होत आहेत. प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमावली आलेल्या नागरिकांना सांगितल्या जात आहेत. योग्य त्या घेतलेल्या परवानग्यांची झेरॉक्स कॉपी घेण्यात येत आहे. यामुळे येणाऱया वऱहाडींनाही सामाजिक अंतर राखत विवाहाचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी असणार नियमावली

महानगरपालिकेची परवानगी आवश्यक

परवानगीसाठी अर्जदारांची कागदपत्रे बंधनकारक

मास्क आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे

फक्त 200 लोकांनाच मिळणार प्रवेश

काटेकोर अंमलबजावणीसाठी अधिकाऱयांची देखरेख

यंदा विवाह मुहुर्तांचे 84 दिवस, सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर्सचा अंतरपाट

Related Stories

हब्बनहट्टी गावाजवळ रस्त्यावर सापडली पाचशे रुपयाची नोट

Patil_p

प्लास्टिकचा वापर आढळल्यास कठोर कारवाई

Omkar B

रोहित पाटील, कुणाल निंबाळकरचे कराटे स्पर्धेत यश

Amit Kulkarni

सदाशिवनगर येथील जागेत पुन्हा भू-माफियांचा प्रताप

Patil_p

वाहतूक पोलीस हवालदाराचा हृदयाघाताने मृत्यू

Patil_p

ता.पं.स्थायी समित्यांच्या बैठकीकडे दुर्लक्ष

Patil_p
error: Content is protected !!