तरुण भारत

दिल्लीत मागील 24 तासात 5 हजारपेक्षा अधिक रुग्ण ; 98 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 5 हजार 482 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 56 हजार 744 वर पोहचली आहे. यामधील 38,181 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements

काल दिवसभरात 5,937 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 09 हजार 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8,909 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 61 लाख 04 हजार 158 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 28,100 आरटीपीसीआर टेस्ट आणि 36,355 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांना अटक

Patil_p

बाधितांच्या संख्येत किंचित वाढ

datta jadhav

मंदिरांच्या रक्षणासाठी सरसावले सरकार

Patil_p

गेल्या 24 तासांत देशात 30,773 कोरोनाबाधित

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

tarunbharat

नरेंद्र मोदी सरकारवर बरसले राहुल गांधी

Patil_p
error: Content is protected !!