तरुण भारत

प्रो बॅडमिंटन लीग लांबणीवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदाची प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेची सहावी आवृत्ती पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला. कोव्हिड-19 च्या संकटामुळे आरोग्य व खेळाडूंची सुरक्षितता या बाबी लक्षात घेत आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावरील सर्वाधिक बक्षीस रकमेसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे मागील आठवडय़ापासून दिल्ली, मुंबई व पुणे येथे खेळवली जाणे अपेक्षित होते. या स्पर्धेची पाचवी आवृत्ती यापूर्वी दि. 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत चार शहरात संपन्न झाली आहे. यंदा मार्चमध्ये ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा झाल्यानंतर फक्त डेन्मार्क ओपन ही एकमेव बॅडमिंटन स्पर्धा या हंगामात होऊ शकली आहे.

Advertisements

Related Stories

ब्लॉकबस्टर फिनिश! पोलार्ड जिंकला!

Patil_p

प्रेंच टेनिस स्पर्धा खरेदी तिकीटांचे पैसे देणार

Patil_p

..तर हाफीजची निवृत्ती लांबणीवर

Patil_p

आरसीबीचे प्रशिक्षक माईक हेसन मायदेशी रवाना

Patil_p

स्पेन, न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मर्सिडीजच्या हॅमिल्टनचे 100 वे जेतेपद

Patil_p
error: Content is protected !!