तरुण भारत

कोल्हापूर : वीज बिलाचे हफ्ते सवलत म्हणजे जनतेची चेष्टा

प्रतिनिधी / कोल्हापूर :

वीज बील माफ करण्याचे आश्वासन देवून नंतर लॉकडाऊन काळातील वीज बिल हप्त्याने अथवा बीलामध्य सवलत देण्याची भाषा करुन शासन जनतेची प्रुर चेष्टा करत आहे. हप्ता किंवा सवलत देण्याची मागणी कधीच केलेली नाही. याप्रकारचा निषेध करत वीज बील भरणार नाही कृती समितीने लॉकडाऊन काळातील वीज बील शंभर टक्के माफ करण्याची मागणी केली आहे. बील वसुल करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

Advertisements

  पत्रकात म्हटले आहे, शासकीय कर्मचाऱयांच्या पगारासाठी शासन 50 हजार कोटी कर्ज घेवू शकते. मात्र जनतेसाठी 9 हजार कोटींचे कर्ज शासन घेवू शकत नाही. शासकीय कर्मचाऱयांसाठी शासन तत्पर आहे, मात्र जनतेला हप्त्याने वीज बील भरायला लावणारे पत्रक काढून हे सरकार जनता विरोधी असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अनेकांवर अर्थिक संकट कोसळले आहे. रोजगार बंद पडले आहेत, अशा गंभीर परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी वीज बील भरायला सांगून सरकार जनतेला गृहीत धरत आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने शंभर टक्के वीज बील माफ करावे,  अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक होवून उग्र झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा समितीचे निवास साळोखे, बाबा पार्टे, राजू भोसले, जयकुमार शिंदे, प्रकाश घाटगे, संदीप घाटगे यांनी दिला आहे.

Related Stories

वारणा दूध संघाच्या आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

triratna

कोरोनासह साथरोग नियंत्रणाचे ‘आरोग्य’ पुढे आव्हान

triratna

वाईन शॉप मध्ये ही प्रवेश थर्मल टेस्टींगनेच

triratna

जादा पाणी वापरणाऱ्यांना शहरात वाढीव पाणीपट्टी

triratna

‘गोकुळश्री’ चा निकाल जाहीर

triratna

‘सुरेखा’ च्या यशाने आनंदला धनगरवाडा !

triratna
error: Content is protected !!