तरुण भारत

लालूंच्या जामिनावर 11 डिसेंबरला सुनावणी

रांची

 राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना जामिनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. चारा घोटाळय़ातील दुमका कोषागारप्रकरणी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. झारखंड उच्च न्यायालयात याप्रकरणी 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही जामिनावरील त्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. चारा घोटाळय़ातील वेगवेगळय़ा चार प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. आता त्यांना दुमका कोषागार प्रकरणी जामीन मिळाल्यास त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चारा घोटाळय़ातील दुमका कोषागारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केल्याने त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू आहे.

Advertisements

Related Stories

बंगालमध्ये आता ओवैसींची कसोटी

Amit Kulkarni

गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

महिला आमदारानेच चालविला जेसीबी

Patil_p

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

datta jadhav

जम्मू काश्मीर : सिनेमा हॉल, कोचिंग सेंटर 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू

pradnya p

भारतात येणार आणखी पाच ‘राफेल’ विमाने

datta jadhav
error: Content is protected !!