तरुण भारत

टेंडाकडून ‘पॉकेट मोबाईल वायफाय’ उपकरण सादर

जिओसह अन्य कंपन्यांना देणार टक्कर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

वायफाय मॉडेल निर्मिती करणारी भारतीय कंपनी टेंडाने नवीन पॉकेट मोबाईल वायफाय हॉटस्पॉट उपकरण सादर केले आहे. हे कॉम्पॅक्ट उपकरणाचे मॉडेल 4- जी 180 आणि 4-जी 185 आहे. कंपनीने सदरचे उपकरण हे लहान कार्यालये आणि घरात वापरण्यासाठी डिझाइन केले असल्याचे सांगितले आहे. विशेष करुन ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडून जे घरातून काम करत आहेत, त्या ग्राहकांसाठी हा विशेष पर्याय म्हणून वापरता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सदर उपकरणांमध्ये कोणत्याही कंपनीची 4 जी सिम बसविता येणार असून त्या आधारे ग्राहकांना वायफाय सुविधा वापरता येणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय बाजारात स्टायलिश लूकला असलेल्या मागणीमुळे अगोदरपासून असणाऱय़ा जिओवायफाय आणि एअरटेल हॉटस्पॉट यांना टक्कर देणारे हे उपकरण तयार असल्याचाही विश्वास टेंडा कंपनीने व्यक्त केला आहे.

Related Stories

डेलचा एक्सपीएस 17 लॅपटॉप सादर

Patil_p

रेडमी 9 पॉवर आज होणार दाखल?

Omkar B

वनप्लस-9 आवृत्ती 2021 मध्ये येणार

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p
error: Content is protected !!