तरुण भारत

अदानी गॅसचे होणार नामकरण

नवी दिल्ली 

  सिटी गॅस वितरण व्यवसायात कार्यरत असणारी खासगी क्षेत्रातील कंपनी अदानी गॅस लि.आपले नाव बदलण्याचे संकेत आहेत. यामध्ये सदरचे नाव बदलून अदानी टोटल गॅस करणार आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहातील या कंपनीच्या नावात फ्रान्सची पेट्रोलियम कंपनी टोटलची हिस्सेदारी दाखविण्याची शक्यता आहे. या कंपनीमध्ये अदानी समूह आणि टोटल दोन्हींची हिस्सेदारी 37.40-37.4 टक्के आहे. अन्य 25.20 टक्के समभाग सार्वजनिक समभागधारकांकडे आहेत. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. दोन्हीकडून नावासंदर्भात मोठी उत्सुकता राहणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisements

Related Stories

ऍमवे इंडिया करणार 30 कोटींची गुंतवणूक

Patil_p

ऊर्जा मागणी 6 टक्के वाढणार

Patil_p

मारुती सुझुकीच्या एरिनामार्फत विक्रीला 3 वर्षे पूर्ण

Patil_p

वनप्लसचा स्मार्ट टीव्ही, फोन जुलैमध्ये

Patil_p

व्होडाफोन-आयडियाकडून 3,354 कोटी अदा

tarunbharat

क्रिप्टो करन्सीमार्फत आता करा खरेदी

Patil_p
error: Content is protected !!