तरुण भारत

निलेश काब्रालांचा अखिल भारतीय वकील मंचाकडून निषेध

प्रतिनिधी/ पणजी

विजमंत्री निलेश काब्राल यांनी विकीलांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय वकील मंचाच्या गोवा विभागाने निषेध व्यक्त केला आहे. निलेश काब्राल यांचे वक्तव्य हे बेफिकीरीपणाचे असून एका लोक प्रतिनिधीला असे बोलणे शोबत नाही. काब्राल यांनी त्वरीत राजिनामा द्यावा. अशी मागणी अखिल भारतीय वकील मंच गोवा विभागाचे अध्यक्ष ऍड. अविनाश भोसले यांनी केली आहे. 

येथील अझीद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. भोसले बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स]िचव ऍड. व्हिक्टर ब्रागान्झा, ऍड. जतीन नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. वकील आपली कामे कायद्याला धरूनच करीत असतात त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी काब्राल यांनी अभ्यास करणे जरूरीचे आहे. असेही भोसले यांयनी सांगितले.

10 ऑक्टोबर रोजी  मंत्री निलेश काब्राल यांनी गोव्यातील वकील लोकांकडून भरमसाठ पैसे आकारत असल्याचे वक्तव्य केले होते. वकील सर्वसामान्य लोकांना शुल्लक कारणावरून लुटत असतात. हा मुद्दा विधान सभेत नेऊन त्याच्यावर तोडगा काढणार असल्याचेही काब्राल म्हणाले होते. वास्तविक अगोदर तोडगा काढावा नंतर प्रसार माध्यमा समोर बोलावे अगोदरच वकील लोकांना लुटतात असे वक्तव्य करणे काब्राल यांना शोभत नाही. काब्राल यांनी वकील मंचाचीची जाहिर माफी मागावी असेही ऍड. भोसले म्हणाले.

Related Stories

जमशेदपूरला नमवून एटीके आता पहिल्या स्थानावर

Amit Kulkarni

बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळाचा नाहक दाखला मंजूर

Patil_p

देशविदेशात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी पोर्टल

Omkar B

मेरशी पंचायतीतही भाजप विरुद्ध भाजप

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर 1.26 कोटीचे सोने जप्त

Patil_p

नाफ्ताच्या संकटातून गोव्याला मुक्त करण्यासाठी एमपीटीला बसला पंचवीस कोटींचा फटका

Patil_p
error: Content is protected !!