तरुण भारत

परप्रांतीय मुकेशचा आणखी एक कारनामा समोर

युवतीवर अत्याचार करुन दागिने लंपास

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

साताऱयातील एका उपनगरातील महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिला जाळय़ात ओढून तिच्यावर अत्याचार करणारा परप्रांतीय मुकेश विश्वकर्मा सध्या सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने साताऱयानजीकच्या एका गावातील 24 वर्षीय युवतीला फशी पाडून तिच्यावर अत्याचार केले असून तिचे दागिनेही हडप केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुकेश विश्वकर्मा हा सराईत गुन्हेगार असून महिलांना जाळय़ात ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्याची विकृत्ती त्याच्यात आहे. एका उपनगरात भाडय़ाने खोली घेऊन राहणारा विश्वकर्मा कधी पुण्यात, कधी झारखंडमध्ये सातत्याने येऊन-जावून असतो. दिसायला आकर्षक, छानछौकी राहणे, यातूनच त्याने साताऱयानजीक एका गावातील 24 वर्षीय युवतीशी इंस्ट्राग्रामवरुन ओळख वाढवली. त्यातून त्या दोघात प्रेम झाले.

त्यानंतर विश्वकर्माने युवतीला तिच्या घरातील लोकांना मारुन टाकण्याची धमकी देत तिला कास येथील एका हॉटेलात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर  नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्याने तिला पुण्यात नेऊन अत्याचार केले. त्यानंतर कळस म्हणजे त्याने युवतीला झारखंडला नेत मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले असून तिच्या गळय़ात सोन्याची चेनही जबरदस्तीने काढून घेतली आहे.

त्यानंतर तिला साताऱयात आणून सोडले. डिसेंबर 2019 ते 25 नोव्हेंबर 2020 पर्यंत हा सर्व प्रकार घडला असून पीडीतेने घरच्या लोकांना याबाबत सांगितल्यानंतर तिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत मुकेश विश्वकर्माचा कारनामा समोर आणला. त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हाच सराईत गुन्हेगार मुकेश विश्वकर्मा सध्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.

परप्रांतीयांना भाडय़ाने ठेवताना विचार करा

परप्रांतीय युवक नोकरी, कामाच्या निमित्ताने साताऱयासह जिल्हाभरात येत असतात. येथे आल्यानंतर भाडय़ाच्या अमिषापोटी अनेकजण त्यांना घरे उपलब्ध करुन देतात. मात्र, अशा युवकांनी येथील अनेक महिला, युवतींना अशा प्रकारे फशी पाडलेले आहे. याबाबत अब्रुच्या भीतीने तक्रारही होत नाहीत. अशा परप्रांतियांना भाडय़ाने ठेवतानाच त्यांची माहिती त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांना दिली पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच परप्रांतियांची गुन्हेगारी जिल्हय़ात वाढत आहे.

Related Stories

महाराष्ट्राला ३ कोटी लसीचे डोस केंद्राने द्यावे – राजेश टोपे

triratna

रेठरेधरणच्या ‘त्या’रुग्णाच्या रिपोर्ट बाबत संशय?

triratna

‘त्या’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथना फटकारलं

triratna

कबनूरात आणखी दोन बाधित

triratna

चिंताजनक : महाराष्ट्रात आत्तापर्यंत 15,591 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P

कोयना धरणाचा पाणीसाठा ८ फुटांनी वाढला

Amit Kulkarni
error: Content is protected !!