तरुण भारत

मोटार सायकल चोरी प्रकरणी जोडगोळीला अटक

मुरगोड पोलिसांची कारवाई, सहा मोटार सायकली जप्त

 प्रतिनिधी / बेळगाव

मोटार सायकल चोरी प्रकरणी एका जोडगोळीला अटक करुन त्यांच्या जवळील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मुरगोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.

राघवेंद्र लाडाप्पा कातर्की, बसवराज फकिराप्पा सालमंटपी (दोघेही रा. चिचखंडी बी.के., ता. मुधोळ, जि. बागलकोट) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलीस उपअधिक्षक शंकरगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

2 ऑगस्ट 2020 रोजी यरगट्टी (ता. सौंदत्ती) येथे केए 24 के 6872 क्रमांकाची हिरो स्प्लँडरप्लस मोटार सायकलची चोरी झाली होती. या प्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी राघवेंद्र व बसवराज या दोघा जणांना नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकलवरुन जाताना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सहा मोटार सायकली चोरल्याचे उघडकीस आले.

Related Stories

कोरोनाबाधितांना आता मुंग्यायुक्त अंडी!

Patil_p

शहरात उन्हाचा तडाखा

Patil_p

महामार्गावर थांबणाऱया बसेसमुळे प्रवाशांना धोका

Amit Kulkarni

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू

Patil_p

किल्ला तलाव विकासासाठी 7 कोटींची योजना

Patil_p

जि.पं.अध्यक्षा आशा ऐहोळे यांचा पाहणी दौरा

Patil_p
error: Content is protected !!