तरुण भारत

सकाळच्या सत्रातील बेंगळूर विमानसेवा पूर्ववत करा

प्रतिनिधी/ बेळगाव

सकाळच्या सत्रात बेंगळूरवरून बेळगावला येणारे विमान स्पाईस जेट कंपनीने तांत्रिक कारण देत बंद केले आहे. गुरुवार दि. 26 पासून ही फेरी रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही ही फेरी बंद का करण्यात आली, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत. ही विमानफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisements

सकाळी बेंगळूरहून बेळगावला स्पाईस जेट कंपनीने विमान दाखल होत होते. यामुळे सकाळच्या सत्रात बेळगावला येणाऱया प्रवाशांना सोयीचे ठरत होते. प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, उद्योजक या विमानाने बेळगावमध्ये दाखल होत होते. दिवसभराची कामे आटोपून सायंकाळच्या विमानाने पुन्हा बेंगळूरला परतणे सोयीचे ठरत होते. परंतु ही विमानफेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

स्पाईस जेट कंपनीने तांत्रिक कारणाने ही फेरी रद्द करत असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या स्वरुपात फेरी बंद करण्यात आली असून लवकरच सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु ती केव्हा सुरू होणार याबाबतची निश्चिती नसल्याने प्रवासी संभ्रमात आहेत. एकीकडे बेळगाव विमानतळ प्रवासी संख्येत राज्यातील तिसऱया क्रमांकाचे विमानतळ असताना ही फेरी का रद्द केली, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

स्पाईस जेटने सकाळी बेंगळूर फेरी रद्द केल्यामुळे इतर विमान फेऱयांवरचा भार वाढला आहे. इंडिगो व अलायन्स एअरची विमानसेवा दररोज सुरू आहे. आठवडय़ातील निवडक दिवशी स्टार एअरही सेवा देत आहे. दररोज 3 फेऱया बेंगळूरला असूनही सर्व फेऱयांचे बुकिंग फुल्ल असायचे. आता त्यातील एक फेरी बंद झाल्यामुळे इतर विमान फेऱयांवर भार वाढला आहे. त्यामुळे बेंगळूर-बेळगाव विमानफेरी लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. 

Related Stories

जामतारा… सायबर गुन्हेगारांचा ध्रुव तारा

Amit Kulkarni

कर्नाटक: मंत्री एस.टी. सोमशेकर कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सफाई कर्मचाऱयांच्या समस्या निवारणाचा ठराव

Amit Kulkarni

बॉक्साईट रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

न्यायालय आवारात पार्किंगसाठी मार्किंग

Amit Kulkarni

विनापरवाना व्यावसायिकांकडून 18 हजार रुपये दंड वसूल

Omkar B
error: Content is protected !!