तरुण भारत

हैदराबाद एफसी-बेंगलोर एफसी लढत गोलशून्य बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी हैदराबाद एफसी आणि बेंगलोर एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. बेंगलोर एफसीची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. हैदराबादचे आता दोन सामन्यांतून 4 तर बेंगलोर एफसीचे 2 गुण झाले आहेत.

Advertisements

पहिल्या सत्रातील सामन्यावर हैदराबाद एफसीचे वर्चस्व आढळून आले. सामन्यातील पहिली धोकादायक चाल बेंगलोर एफसीने पाचव्याच मिनिटाला रचली. यावेळी त्यांच्या मुहम्मद आशिक कुरुनियाने मारलेला फटका चेन्नईन एफसीचा गोलरक्षक सुब्रोतो पॉलने अडविला. त्यानंतरच्या खेळावर हैदराबाद एफसीने आपला दबदबा ठेवला. संपूर्ण सामन्यात एकदाही बेंगलोरला हैदराबादच्या गोलवर टार्गेट करता आले नाही. 

प्रथम 24व्या मिनिटाला बेंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंगने आपण भारताचा अव्वल गोलरक्षक का आहे, हे सिद्ध करताना आरिदाने सँटोसचा शक्तिशाली फटका उत्कृष्टपणे झेपावत अडविला. लुईसने घेतलेली आरिदानेची हेडर अफलातून होतीच, पण गुरप्रीतने ती उत्कृष्टपणे अडवून संघावर होणारा संभाव्य गोल टाळला.

त्यानंतर लढतीच्या 38व्या मिनिटाला मोहम्मद यासिरच्या पासवर हालीचरण नर्झारीने हाणलेला फटका गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने ब्लॉक केला. दुसऱया सत्रातही हैदराबादने सामन्यावर वरचष्मा ठेवला. प्रथम 55व्या मानिटाला आरिदाने उजव्या बगलेतून हाणलेला फटका गोलरक्षक गुरप्रीतने ब्लॉक केला.

त्यानंतर बेंगलोरच्या एरीक पार्तालूने दिलेल्या पासवर क्लिटॉन सिल्वाचा गोल नोंदविण्याचा यत्न सुब्रोतोने उधळून लावला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी हैदराबाद एफसीच्या हालीचरण नर्झारी आणि बेंगलोर एफसीच्या क्लिटॉन सिल्वाचे गोल करण्याचे यत्न दिशाहीन ठरले.

Related Stories

महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

Patil_p

अँजेलिक केर्बरची दुखापतीमुळे माघार

Patil_p

इंग्लंडचा सर्वात मोठा विजय

Patil_p

मेक्सिकोला नमवत ब्राझील अंतिम फेरीत

Patil_p

तुर्कीत फुटबॉलला जूनमध्ये प्रारंभ

Patil_p

प्रशिक्षक जसपाल राणा क्रोएशियात दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!