तरुण भारत

4 ऐवजी 2 महिन्यांचा असणार हरिद्वार महाकुंभ

नोंदणी अनिवार्य : मेळय़ात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणीचा विचार

हरिद्वार/ वृत्तसंस्था

Advertisements

12 वर्षांनी होणारा हरिद्वार महाकुंभ यंदा 11 व्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये आयोजित होणार आहे. ग्रहमानाच्या स्थितीमुळे कुंभमेळा यंदा  एक वर्ष अगोदर आयोजित होत आहे. अशा स्थितीत सर्व निर्मिती कार्ये पूर्ण करण्याचे आणि कोरोनाचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने हा सोहळा यशस्वीपणे पार पडावा याकरता कंबर कसून  विकासकामांना वेग दिला आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात देश तसेच जगातील हा पहिला मोठा धार्मिक सोहळा असणार आहे. याचमुळे याचा कालावधी 4 वरून कमी करत 2 महिने करण्यात आला आहे. हा महाकुंभ आता 11 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत चालणार आहे. सर्वसाधारणपणे महाकुंभ 14 जानेवारीपासून सुरू होतो. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण केली जाणार असल्याचे उद्गार मेळय़ाचे प्रमुख अधिकारी दीपक रावत यांनी काढले आहेत.

प्रवेशापूर्वी अँटीजेन चाचणी

पहिल्यांदाच भाविकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कुंभमेळय़ात प्रवेशापूर्वी अँटीजेन चाचणीचा विचार केला जात आहे. अशा स्थितीत गंगानदीत स्नानापूर्वी कोविड-19 निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. मेळा क्षेत्रात मागील वर्षी 18 ठिकाणी 32 तात्पुरते पूल निर्माण करण्यात आले होते. यंदा 3 ठिकाणी 5 तात्पुरते पूल निर्माण केले जाणार आहेत.

महाकुंभपूर्वी चारधाम मार्ग

चारधाम यात्रा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यमुनोत्री मार्ग ग्रीन झोनमध्ये येतो आणि हे क्षेत्र पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील आहे. कोरोनामुळेही काम प्रभावित झाले आहे. परंतु आता सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत, कामही वेगाने सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी दिली आहे. महाकुंभपूर्वी काम पूर्ण करण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. महामार्गामुळे महाकुंभमुळे येणारे भाविक चारधाम यात्राही सुलभपणे करू शकणार आहेत.

सोशल डिस्टन्सिंगसह पवित्र स्नान

भाविकांना सोशल डिस्टन्सिंगसह स्नान करविण्यासाठी पहिल्यांदाच सामान्य घाटांसह कृत्रिम घाटही वापरले जाणार आहेत. प्लास्टिकने तयार होणाऱया या घाटांवर डीपवॉटर बॅरिकेडिंग केले जाणार आहे. आतापर्यंत बाहेरील भाविक 50 पेक्षा अधिक घाटांवर स्नान करत आले आहेत. यंदा गंगा कालव्याच्या घाटांवरही स्नान करविले जाणार आहे. तर पहिल्यांदाच शाही स्नानात निवडक संत सामील होतील.

Related Stories

सुखोई-30 विमानांमधून ‘रुद्रम’ किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

datta jadhav

बिहारच्या प्रीति प्रियदर्शिनीला प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कार

Patil_p

कोरोना : उत्तराखंडात 162 नवे रुग्ण; 04 मृत्यू

Rohan_P

492 वर्षांच्या लढय़ानंतर साकारतेय राममंदिर

Patil_p

एका दिवसात तब्बल 10 हजार रुग्ण बरे

Patil_p

खुशखबर! नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळेल

Rohan_P
error: Content is protected !!