तरुण भारत

जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाला प्रतिसाद

जिल्हा विकास परिषद निवडणूक : कडेकोट सुरक्षा तैनात

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांसाठी निवडणूक आणि पंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात दुपारपर्यंत 40 टक्के मतदानाची नोंद झाल्याने दिवसअखेरचा आकडा 50 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदला गेला. रविवारी यासंबंधीची अधिकृत टक्केवारी निवडणूक आयोग जारी करणार आहे. शनिवारी काश्मीरमधील 25 आणि जम्मूतील 18 मिळून 43 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. ही निवडणूक प्रक्रिया 28 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. सर्व टप्प्यांचे मतदान झाल्यावर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याआधी ज्या जागांवर फक्त एकच उमेदवार होते आणि विरोधात कोणीच नव्हते, अशा सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी जाहीर करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये पंचायतीच्या पोटनिवडणुकांमध्ये 804 सरपंच, पंचांची बिनविरोध निवड झाली. यात 768 पंच आणि 36 सरपंच यांचा समावेश आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विरोधात एकही उमेदवार निवडणूक लढवत नसल्यामुळे ही घोषणा करण्यात आली. उर्वरित जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.

काश्मीर विभागामध्ये 11 हजार 500 पंचांची पदे आणि 890 सरपंचांची पदे रिक्त आहेत. तसेच जम्मू विभागामध्ये 185 पंचांची पदे आणि 124 सरपंचांची पदे रिक्त आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह प्रादेशिक पक्षांनी 2018 मध्ये पंचायतींच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. हा बहिष्कार असूनही त्या वषी निवडणुकांमध्ये 83.5 टक्के एवढे मतदान झाले होते.

Related Stories

भाडय़ाने घर घेणे-देणे होणार सोपे

Patil_p

मध्यान्ह आहारात मिळणार फोर्टिफाइड राइस

Patil_p

इसिसच्या संपर्कातील डॉक्टरला एनआयएकडून अटक

datta jadhav

रावत यांना होमहवन करुन श्रद्धांजली

Patil_p

मंगळवारी 6,777 रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

मागील साडेचार वर्षात दिल्या 4.5 लाख तरुणांना नोकऱया

Patil_p
error: Content is protected !!