तरुण भारत

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पेट्रोल पंपावरुन बाटलीमधून पेट्रोल

राजकीय पक्षाचा पदाधिकारी चालवतोय पंप : पोलिसांकडून दुर्लक्ष

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

बाटलीमध्ये पेट्रोल देऊ नये अशा सक्त सूचना पोलीसांनी करूनही बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पेट्रोल पंपावरून बिनधास्तपणे बाटलीमधून पेट्रोल दिले जात आहे. हा पेट्रोलपंप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी चालवत असल्यामुळे अशा घटनांकडे पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे की काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, संबंधित पेट्रोलपंप चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गेल्यावर्षी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत सेवा रस्त्या नजिकच्या झाडीमध्ये  पिरवाडी (सातारा) परिसरामध्ये पेट्रोल अंगावर टाकून एका युवकाचा जाळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सातारा जिल्हा पोलीस दलाने सातारा शहर व परिसरातील सर्व पेट्रोल पंप चालकांना बिसलरीच्या बाटलीत पेट्रोल न देण्याच्या सक्त  घटना केल्या होत्या.

बिसलरी बाटलीमध्ये पेट्रोल दिले जाणार नाही असे कागदी फलक पेट्रोल पंपावर लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी तात्काळ सातारा शहर व परिसरातील सर्व  पेट्रोल पंप चालकांनी केली. मात्र काही पेट्रोल पंप चालकांनी पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असे म्हणत बिसलरीमध्ये पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे.

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी गेले अनेक वर्ष पेट्रोल पंप चालवत आहे. अलीकडच्या काळात पोलीस दलाच्या सूचना बासनात बांधून या पेट्रोल पंपावरून मोठय़ा प्रमाणावर बिसलेरीच्या बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास येत आहे. त्यामुळे सातारा शहर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे पोलिसांनी संबंधित पेट्रोल पंप चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

आक्रोश मोर्चाला मोर्चाला ‘स्वाभिमानी’ने दिली स्थगिती

Abhijeet Shinde

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Patil_p

पालिका कर्मचाऱयांना 36 वर्षांनी न्याय

Omkar B

कर्जमाफी राहिलेले लाभार्थी नवीन कर्जापासून वंचित

Patil_p

सातारा : नेले येथे चिकन वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

datta jadhav

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

Patil_p
error: Content is protected !!