तरुण भारत

कराडला वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता रॅली

वार्ताहर/ कराड

कराड नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 जनजागृती रॅली शहरातून काढण्यात आली. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड शहराला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हॅट्ट्रिक साधणे तसेच नैसर्गिक साधनसामुग्रीच्या संवर्धनाबाबत संदेश देत ही रॅली काढण्यात आली होती.

Advertisements

 रॅलीमध्ये नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप,  विद्या पावसकर, अंजली कुंभार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता आर. डी. भालदार, मिलिंद शिंदे, गीतांजली यादव, दीपाली रेपाळ, गणेश जाधव, प्रमोद जगदाळे, एन्व्हायरो पेंडस् नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, स्वच्छता दूत सलीम मुजावर, विवेक ढापरे, सर्व आरोग्य कर्मचारी, महिला कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, स्वच्छता दूत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये संत गाडगेमहाराज, संत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. 

पांढरीचा मारूती चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. कृष्णा नाका, दत्त चौक, चावडी चौक, कन्या शाळामार्गे रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप नगरपालिकेत करण्यात आला. यावेळी सर्वांनी प्लास्टिकचा वापर करणार नाही व शहराच्या स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी विजय वाटेगावकर यांनी नागरिकांनी स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. रमाकांत डाके यांनी नागरिकांनी उघडय़ावर थुंकू नये, थुंकल्यास दंड होणार असून दुसरा कोणी थुंकताना दिसल्यास त्याचा फोटो काढला तर फोटो काढणाऱयास 200 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून तो फोटो नगरपालिकेत लावण्यात येणार आहे, असे सांगितले. विनायक पावसकर यांनी थुंकणाऱया कोणासही कोणत्याही पदाधिकाऱयाने पाठीशी घालू नये, असे आवाहन केले. यावेळी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

सातारा जिल्ह्यात नवे 512 कोरोना बाधित, 20 तर मृत्यु

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस

Abhijeet Shinde

सातारा : गुलाबाची फुले देऊन अभियंता, ठेकेदारांचे स्वागत

datta jadhav

“भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात?”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

Abhijeet Shinde

साताऱ्यात दोन्ही राजेगटांत घमासान

Abhijeet Shinde

आता आले चक्क साडी नेसण्याचे ही कोर्स

Patil_p
error: Content is protected !!