तरुण भारत

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी / नागठाणे :
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घालूनही वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशियाई महामार्गावरील वळसे (ता.सातारा) येथील तीन हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली.


याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे १२.१५ च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यानी विहित केलेल्या वेळेनंतरही दोन हॉटेल व एक चहा टपरी उघडी असल्याचे आढळले.

Advertisements

पोलिसांनी वळसे येथील हॉटेल इंद्रराजचा चालक नारायण आनंदराव कदम (रा.वळसे),हॉटेल राजधानी पेलेसचा चालक अमित बजरंग कदम (रा.शेंद्रे),हॉटेल अनुश्री समोरील टपरी चालक प्रवण शंकर काकडे (रा. बोरगाव) व कामगार समीर जयवंत पडवळ( रा.भरतगाव) यांच्याविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

सज्जनगड भाविकांसाठी खुला

datta jadhav

सातारा पालिकेच्या विषय समितीच्या निवडीची विशेष सभा सोमवारी

Patil_p

साताऱ्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे

Abhijeet Shinde

अन् व्हॉल्व्हमधून निघाली शॉम्पूची बाटली

Patil_p

सोनजाई डोंगरावर दोन हजार वर्षापूर्वीची लेणी उजेडात

datta jadhav

गुंड बंटी जाधवला पंजाबमध्ये अटक

Patil_p
error: Content is protected !!