तरुण भारत

DRDO ने तयार केली ड्रोनविरोधी यंत्रणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय लष्करासाठी आवश्यक असणारी ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करण्याची आणि त्याच्या निर्मितीची जबाबदारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) इंडिया इलेक्ट्रॉनिक्सवर सोपवली आहे. ही ड्रोनविरोधी यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भाग असल्याचेही सांगितले जात आहे. यापुढे पोर्टेबल ड्रोन किलर मोदींच्या ताफ्यात असतील. 2020 च्या सुरुवातीपासून ड्रोनचा धोका लक्षात घेऊन ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे पाठवण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी चिनी बनावटीच्या व्यावसायिक ड्रोनचा वापर करत आहेत. DRDO ने निष्क्रिय आणि सक्रिय एन्ट्री ड्रोन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे शत्रूचे ड्रोन अकार्यान्वीत करू शकते. किंवा खाली पाडू शकते. 

DRDO चे प्रमुख सतीश रेड्डी लवकरच लष्कराला स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणेच्या निर्मितीची माहिती देणार आहेत. यंदा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी तैनात करण्यात आलेल्या ड्रोनविरोधी यंत्रणांची रेंज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत आहे. ड्रोनच्या शोधासह फ्रिक्वेन्सी सिग्नल्सच्या माध्यमातून त्याचे रडार यूएव्हीला जॅम करते. दुसरा विकसित पर्याय म्हणजे ड्रोन पाहिल्यानंतर लेझर बीमला लक्ष्य करणे, असा आहे.  

Related Stories

पुणे विभागात 1 हजार 457 रुग्ण; आतापर्यंत 88 मृत्यू

Shankar_P

काय सांगताय? दागिने विकून अंबानी काढताहेत दिवस!

Patil_p

व्लादिमीर पुतिन यांचा दबदबा कायम! 2036 पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

pradnya p

हाथरस : उच्च न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय चौकशी

Patil_p

पंतप्रधान मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद

Patil_p

चीनमध्ये पूराचा कहर, लाखो लोकांचे स्थलांतर

Patil_p
error: Content is protected !!