तरुण भारत

दापोलीत पर्यटनक्षेत्र पुन्हा शांत होण्याची शक्यता

वार्ताहर/मौजेदापोली

मिनिमहाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यामध्ये पर्यटकांची गर्दी दिवाळीपासून वाढलेली आहे. त्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून पर्यटकांची वाट पाहणाऱया हॉटेल, रिसार्ट व्यावसायिकांना सुगीचे दिवस दिसून आले. परंतू ही पर्यटकांची संख्या लॉकडाऊनच्या भीतीने शांत होण्याची शक्यता दापोलीतील पर्यटन व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गणपतीपुळे या ठिकाणी 80 ते 90 टक्के पर्यटक हे पुणे येथून पर्यटनाला येतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी दापोलीत बहूसंख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. काही पर्यटकांना कोणी रूम देतय का रूम अशी विचारण्याची वेळ आली आहे. परंतु 30 नोव्हेंबर नंतर मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली. पुणे येथे लॉकडाऊन करण्यास सुरूवात करण्यात आल्याने दापोलीत दाखल झालेल्या पर्यटकांना त्यांच्या नातेवाईकांकडून घरी परत येण्याबाबत फोन येवू लागले आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी रविवारी सायंकाळी घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी चौकशी दरम्यान सांगितले.

Related Stories

जिह्यातील गुरांवर ‘लॅम्पी स्कीन’चा हल्ला!

Patil_p

आंगणेवाडीच्या सर्व सीमा करणार सील

NIKHIL_N

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित क्षेत्राला ग्रामस्थ, व्यापारी आणि ग्रामपंचायतींचा विरोध

Abhijeet Shinde

शिक्षक बदल्यांसमोर अंमलबजावणीच्या अडचणी

Patil_p

पॅरोलवरुन फरार रफिक शेख 7 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

Patil_p

सिंधुदुर्गच्या जंगलात चमत्कारिक माशांचे अस्तित्व

NIKHIL_N
error: Content is protected !!