तरुण भारत

ओडिशा एफसीने जमशेदपूरला रोखले बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेला जमशेदपूर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यातील रोमहर्षक लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. या निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला.

Advertisements

मध्यंतराला जमशेदपूर एफसी संघ दोन गोलांनी आघाडीवर होता. त्यांच्या नॅरीजूस वाल्सकीसने तर ओडिशा एफसीसाठी डायगो मॉरिसियोने दोन्ही गोल केले. दुसऱया सत्रात सामन्याच्या 74व्या मिनिटाला जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टी. पी. रेहनीशला रेड कार्ड मिळाले. त्याने डी कक्षेबाहेर येऊन चेंडू हाथाळला. त्यामुळे त्यांना उर्वरीत वेळेत दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. याचा परिणाम त्यांच्या खेळावर झाला. आक्रमक खेळी करत ओडिशाने शेवटच्या सोळा मिनिटांत दोन्ही गोल बाद केले आणि पराभवाच्या नामुष्कीतून सुटका करून घेतली.

सामन्याच्या 11व्या मिनिटाला जमशेदपूरने पहिला गोल केला. ओडिशाच्या बचावफळीतील गौरव बोराने वॅल्सकीसचा फटका हाताने अडविला. यावर मिळालेल्या पेनल्टीवर वॅल्सकीसने ओडिशाचा गोलरक्षक कमलजीत सिंगला भेदत गोल केला. 27 व्या मिनिटाला ओडिशाला बचावातील चूक कारणीभूत ठरली. बचावपटू शुभम सारंगीच्या चुकीचा फायदा घेत वॅल्सकीसने त्याने बोराला दिलेल्या पास अडवित अफलातून फटक्यावर गोल केला. रेहनेशच्या जागी गोलरक्षक आणण्यासाठी जमशेदपूरच्या मध्यफळीतील जॅकीचंद सिंगला बाहेर जावे लागले. प्रथम जॅकोब ट्राटच्या पासवर ब्राझिलीयन डायगो मॉरिसियोने ओडिशाचा पहिला गोल करून पिछाडी एक गोलने कमी केली तर त्यानेच 90 व्या मिनिटाला डॅनियलच्या पासवर दुसरा गोल करून बरोबरी साधली.

Related Stories

डब्ल्यूटीसी फायनलसाठी नेतृत्व विल्यम्सनकडेच

Patil_p

सुवारेझचा बार्सिलोना बरोबरचा करार समाप्त

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी बॅलेचा मदतीचा हात

Patil_p

पिरोन्कोव्हा, सेरेना, व्हिक्टोरिया अझारेन्का तिसऱया फेरीत

Patil_p

आला रे आला, अजिंक्य आला!

Amit Kulkarni

खेळाडूंच्या हॉटेलपासून अवघ्या 30 किलोमीटर्स अंतरावर विमान कोसळले!

Patil_p
error: Content is protected !!