तरुण भारत

उमेश तळवणेकर यांचा राजीनामा

पेडणे  (प्रतिनिधी) 

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्वःताच काँग्रेस पक्ष  संपविण्याचा  विडा उचलल्यामुळे उत्तर गोवा काँग्रेस  सरचिटणीस व सदस्य पदाचा राजीनामा  दिला असे पेडणे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेश तळवणेकर यांनी जाहीर केले.    पेडणे येथे घेण्यात आलेल्या पञकार परिषदेला तळवणेकर यांच्या सोबत काँग्रेस कार्यकर्ते उत्तम कशालकर व राधाकृष्ण गवंडी उपस्थित होते.

Advertisements

राजकारणात राजकीय पक्ष विरोधी पक्षाला संपवण्याचा व आपला पक्ष वाढविण्यासाठी काम करत असतात तसेच संघटना मजबूत करून राज्यात सरकार स्थापन करण्याचे काम अध्यक्ष करीत असतो. पण गिरीश चोडणकर अध्यक्ष झाल्यापासून पक्ष संपवण्याचे काम करीत आहे.असा आरोप तळवणेकर यांनी केला.

गोव्यात गेल्या निवडणूकीत काँग्रेस  पक्षाला 17 आमदार लोकांनी निवडून दिले होते. त्यातले दोन आमदार व मग विरोधी काँग्रेस  नेत्यांसह दहा आमदार एकूण 12 आमदार भाजप पक्षात गेले. याचं कारण पक्ष संघटनेची पकड गिरीश चोडणकर यांच्याकडे नाही. ते आमदारांना संभाळू शकले नाही. कारण ते आपल्या मनमानी प्रमाणे आमदार व कार्यकत्याकडे वागतात असे तळवणेकर पुढे म्हणाले.

लोकसभा उत्तर गोवा काँग्रेस  उमेदवारी त्यांनी दुसऱयाला द्यायला हवी होती. पण त्यांनी तसं न करता स्वःता अध्यक्ष निवडणूक लढवून पराभूत झाले. व आपले अपयश लपवण्यासाठी राजीनामा देण्याचे नाटक केले व परत आपणच अध्यक्ष झाले. त्यांना सगळय़ाचा स्वार्थ आहे. अशा अध्यक्षांना काय म्हणायचे? लोकसभेत दुसऱयाला उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते.

पेडणे काँग्रेस  गट निवडून आलेली कमिटी कार्यकाळ संपण्याअगोदर  कोणतीही कल्पना न देता विर्सजीत करून लोकशाही प्रमाणे चालणाऱया पक्ष संघटनेचा खून केला. कारण पेडण्याचे  आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर विरोधात काम केलेले चोडणकराना आवडत नसावे. असा संशय आहे नाहीतर कार्यरत कमिटी बरखास्त करण्याचे कारण काय? असा आरोप तळवणेकर यांनी केला.

 ड़ गिरीश चोडणकर अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस  पक्षाला गळती लागली आहे. ज्यांना मतदान आल्यापासून काँग्रेस  पक्षाला मतदान केले असे नेते चोडणकराच्या नेतृत्वाला कंटाळून पक्ष सोडून जात आहे. नेतृत्व बरोबर नाही तर पक्षाला काम करून काय उपयोग? मोठय़ा जड   मनाने राजिनामा जाहीर करतो. असे उमेश तळवणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Stories

काँग्रेसने फक्त आश्वासने का दिली याचा जाब विचारा

Omkar B

..तीन दिवसानंतर आज होणार फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा – दिपक पाऊसकर

Amit Kulkarni

पक्षांतरे व फॅमिली राजला प्रोत्साहन देण्याचे भाजपचे मिशन : डायस

Amit Kulkarni

देतो सांगून 9 लाखांचे दागिन्यांना फसविले

Omkar B

स्वातंत्र्यसैनिकांचे 22 पासून उपोषण

Amit Kulkarni

आपतर्फे आजपासून विज आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!