तरुण भारत

श्रीलंकेत जेलमध्ये दंगल; 8 कैद्यांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / कोलंबो : 

कोलंबोजवळच्या महारा जेलमध्ये कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला. परिणामी उसळलेल्या दंगलीत 8 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर 37 जण जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.

Advertisements

महारा जेलमध्ये रिमांडमध्ये असलेल्या कैद्यांनी रविवारी जबरदस्तीने दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृह प्रशासनाला त्यांच्याविरोधात बळाचा वापर करावा लागला. यावेळी उसळलेल्या दंगलीत कैद्यांनी जेलमधील किचन आणि रेकॉर्ड रूमला आग लावली. 

जेलरला ओलीस ठेवण्याचाही कैद्यांनी प्रयत्न केला. मात्र, जेलरने हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, या दंगलीत 8 कैद्यांचा मृत्यू झाला. तर जेलरसह 37 जण जखमी झाले आहेत.

Related Stories

जिहादींचे समर्थन करणाऱ्या गिलानींना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार

datta jadhav

रशिया, ब्राझीलमधील संकट कायम

Patil_p

नायजेरियात तुरुंगावर हल्ला; 2 हजार कैद्यांनी केले पलायन

datta jadhav

युएईत पारा 51 अंश सेल्सिअसवर

Patil_p

‘फायझर’ भारताच्या मदतीला; पाठवणार 7 कोटी डॉलर्सची औषधे

datta jadhav

कॅलिफोर्नियात कठोर निर्बंध

Patil_p
error: Content is protected !!