तरुण भारत

कोल्हापूर : उजळाईवाडीत स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

गोकुळ शिरगाव / वार्ताहर

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील साई स्क्रॅप या स्क्रॅपच्या गोडाऊनला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागून प्लास्टिक, फायबर, मेटल आशा क्राफ्ट साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान ताराराणी फायर स्टेशन कोल्हापूर येथील जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे गोडाऊन वरून जाणारी उच्च दाब विद्युत वाहिनी व विद्युत खांबाला आगीपासून वाचवत मोठा अनर्थ टळला. तसेच सय्यद यांचे दुसऱ्या विभागात असणारा स्क्रॅपचा माल ही आगीपासून वाचविण्यात जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार उजळाईवाडी येथील पुणे बेंगलोर महामार्गावरील अथायु हॉस्पिटल समोरील सलीम सय्यद यांच्या साई स्क्रॅप या गोडाऊनला आग लागली. यासंबंधीची माहिती सह्याद्री यांना शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गोडाऊन चे मालक व फायर स्टेशन यांना दिली. दरम्यान शेजारील नागरिकांनी फायनल स्टेशनला फोन करून आग लागल्याची वर्दी दिली‌ या आगीमध्ये सलीम सय्यद यांचे तीस हजार रुपयांहून अधिक रकमेच्या स्क्रॅपच्या मालाचे नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी तात्काळ धाव घेत स्टेशन ऑफीसर दस्तगीर मुल्ला, ड्राइवर उमेश जगताप,फायर मैन केरबा निकम, फायर मैन सुशांत जोंधले यांनी आग आटोक्यात आनंद मोठा अनर्थ टाळला.

Advertisements

Related Stories

शाहू स्टेडियमवर ‘जय शिवाजी’..!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘या’ गावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना रुग्णांसाठी आणखी ७०० बेड

Abhijeet Shinde

कुदनूरच्या सेवा संस्थेला सभासदांनी ठोकले टाळे

Abhijeet Shinde

`बैतुलमाल’चा पुरग्रस्त ३ गावांना मदतरुपी आधार

Abhijeet Shinde

पीककर्ज परतफेडीस मुदतवाढीने दिलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!