तरुण भारत

दौलतनगरमध्ये युवतीसह कुटुंबियांना मारहाण

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील रानमळा परिसरातील अलंकार कॉलनीत रस्त्यावर युवतीच्या समोर गाडी का थांबवलीस असे विचारल्याच्या कारणातून एका युवकाने युवतीच्या वडिलांसह, युवतीला हॉकीस्टीकने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. याबाबत रोहन कुंभार (रा. जयमल्हार, महालक्ष्मी मंदिरासमोर, करंजे, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी यातील तक्रारदार युवती चैत्राली देवेंद्र राजेमहाडिक (वय 19, रा. अलंकार कॉलनी, रानमळा रस्ता, दौलतनगर, सातारा) ही मैत्रिणीसमवेत घरी जात असताना रोहन कुंभार हा दुचाकीवरुन आला. त्याने चैत्रालीजवळ जावून गाडी थांबवली. त्यावेळी तिचे वडील देवेंद्र राजेमहाडिक यांनी त्याला जाब विचारल्याच्या कारणातून रोहन कुंभार याने देवेंद्र यांना हॉकीस्टिकने डोक्यात मारुन जखमी केले.

यावेळी चैत्राली त्याला अडवत असताना रोहनने तिला देखील मारहाण करत दहशत निर्माण केली. तसेच चैत्रालीची आई रेश्मा यांना दमदाटी केली. याबाबत चैत्राली राजेमहाडिक हिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी रोहन कुंभारवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.

Related Stories

मावळ्यांनो गडसंवर्धनाच्या कामाला लागा

datta jadhav

नागठाणेत राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

Patil_p

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

“हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम”

Abhijeet Shinde

आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसीची स्थिती – पंकजा मुंडे

Abhijeet Shinde

सातारा : गंभीर रुग्णांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली

datta jadhav
error: Content is protected !!