तरुण भारत

कोकण मार्गावर ‘या’ तारखेपासून धावणार दोन फेस्टिवल स्पेशल रेल्वे

नागपूर – मडगाव, जबलपूर – कोईमतूर साप्ताहिक गाड्यांचा समावेश, प्रवाशांना दिलासा


प्रतिनिधी / खेड

Advertisements

कोकण मार्गावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने दोन फेस्टिवल स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर – मडगाव , जबलपूर – कोईमतूर सुपरफास्ट साप्ताहिक गाड्यांचा समावेश असून ४ डिसेंबरपासून या दोन्ही रेल्वेगाड्या धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर – मडगाव सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस ४ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी ही गाडी नागपूर येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात दर शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी ८.३० वाजता नागपूरला पोहचेल. २२ डब्यांच्या या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वररोड, रत्नागिरी, राजापूररोड, वैभववाडीरोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ सावंतवाडीरोड आदी मार्गावर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीचे आरक्षण १ डिसेंबरपासून खुले होणार आहे.

जबलपूर – कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. दर शनिवारी जबलपूर येथून सकाळी ११ वाजता ही गाडी सुटेल. परतीच्या प्रवासात दर सोमवारी कोईमतूर येथून सायंकाळी ६ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता जबलपूरला पोहचेल. १७ डब्यांची ही गाडी कोकण मार्गावर पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आदी स्थानकांवर थांबणार आहे.

Related Stories

रत्नागिरी : शेती नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष घटनास्थळी जावून करा

Abhijeet Shinde

धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचे तीन बळी

Abhijeet Shinde

बीस साल बाद..! माय-लेकरांची भेट!!

NIKHIL_N

पहिल्या पावसातच निवेंडीत पूल खचला

Patil_p

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान

Patil_p

कासव संवर्धन केंद्र…छे छे मृत्यूकेंद्र!

tarunbharat
error: Content is protected !!