तरुण भारत

प्राप्तीकर रिटर्न फॉर्म बिनचूक कसा भरावा?

प्राप्तीकर खाते दरवषी करदात्यांनी भरावयाच्या फॉर्ममध्ये काही ना काही बदल करीतच असते. खातेदारांना हा फॉर्म सहज व सुलभतेने भरता यावा म्हणून प्राप्तीकर खाते दरवषी बदल करीत असते. दरवषी आर्थिक वर्ष 31 मार्चला संपल्यानंतर त्या आर्थिक वर्षाचा प्राप्तीकर रिटर्न हा 31 जुलैपर्यंत भरावयाचा असतो. पण यंदा कोरोनाच्या महामारीमुळे ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. 2019-2020 या वर्षासाठी भरावयाच्या रिटर्नच्या फॉर्ममध्ये आयकर खात्याने काही बदल केले आहेत. ते पुढीलप्रमाणे

शेअरचा तपशील- आता शेअर व म्युच्युअल फंडातील योजनांतील गुंतवणुकीतून जर लाँग टर्म कॅपिटल गेन्स (एलटीसीजी) जर 1 लाख रुपयांहून अधिक झाला तर तो करपात्र आहे. 31 जानेवारी 2018 पूर्वी खरेदी केलेले काही शेअर व म्युच्युअल फंडांच्या काही योजनात केलेल्या गुंतवणुकांना यातून वगळण्यात आले आहे. या म्युच्युअल फंडाच्या योजना कोणत्या? व हे कोणत्या कंपनीचे शेअर? याचा तपशील इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फॉर्मच्या 112ए शेडय़ुल्डमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला या फॉर्ममध्ये सेक्शन 112ए अन्वये कोणत्या शेअर विक्रीवर आणि कोणत्या इक्विटी ओरिएंटेड फंडवर विक्रीनंतर ‘सिक्मयुरिटीज ट्रान्सॅक्शन’ (एसटीटी) भरला आहे, याचा तपशील देणे अनिवार्य आहे. कोणतीही माहिती लपवू नका. सवलत प्राप्त झालेल्या प्रत्येक शेअरच्या कंपनीचे नाव व त्या शेअरचा संपूर्ण तपशील तसेच म्युच्युअल फंड योजनेचे नाव व त्यांचा पूर्ण तपशील सादर करावा लागतो. याशिवाय करदात्याला इंटरनॅशनल सिक्मयुरिटीज आयडेन्टिफिकेशन नंबर (आयएसआयएन) ही सादर करावा लागतो. याशिवाय शेअरच्या कंपनीचे नाव, किती शेअर विकले, कितीला विकले, कितीला खरेदी केले होते आणि फेअर मार्केट व्हॅल्यू (एफएमव्ही) म्हणजे योग्य बाजारी मूल्य हा तपशील शेडय़ुल्ड 112ए मध्ये रिटर्न फाईल करताना द्यावा लागतो.

Advertisements

कर बचतीचा तपशील- कर वाचविण्यासाठी प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अन्वये करदात्याला जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक मार्चअखेरपर्यंत करता येते. याशिवाय कर वाचविण्याच्या अन्य पर्यायांची पूर्तता ही 31 मार्चपर्यंत करावी लागते. पण यंदाच्या कोरोना महामारीमुळे प्राप्तीकर खात्याची गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत वाढविली होती. आयटीआर फॉर्ममध्ये एक नवे शेडय़ुल आहे. त्यात तुम्ही हा तपशील द्यायला हवा. जर तुम्हाला या गुंतवणुकीचा कर वाचविण्यासाठी फायदा आर्थिक 2019-2020 साठी घ्यायचा नसेल तर कॉलम रिकामा ठेवा. तुम्ही 2020-2021 साठीही या गुंतवणुकीचा फायदा घेऊ शकता. प्राप्तीकर नियमात एक 80डी हे कलम आहे. आरोग्य विमा पॉलिसीच्या भरलेल्या प्रिमियमच्या रकमेवर या कलम 80डी अन्वये प्राप्तीकर सवलत मिळते. खात्यांचा तपशील- करदात्याने एक किंवा त्याहून अधिक बँक खात्यांचा तपशील देऊन कोणत्याही बँकेत कर परतावा पेडिट करावा, याचाही तपशील द्यावा. पॅन आणि आधार तपशील आयडीआर-2 मध्ये हाऊस प्रॉपर्टी शेडय़ुल आहे. यात तुमचा, प्रॉपर्टीच्या सहमालकाचा/मालकिणीचा शिवाय भाडेकरुचा पॅन व आधार यांचा तपशील देणे गरजेचे आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी नव्या अटी- जर तुमचे ढोबळ करपात्र उत्पन्न वजावटींशिवाय अडीच लाख रुपयांहून कमी असेल तर अशांनी आयटीआर फाईल करण्याची गरज नाही. पण तुम्ही काही विशिष्ट व्यवहार केले असतील तर तुम्हाला या वर्षापासून रिटर्न फाईल करणे सक्तीचे आहे. हे व्यवहार म्हणजे- 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम एक किंवा अनेक चालू खात्यांत डिपॉजिट करणे. परदेश प्रवासावर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणे, विद्युत बिलाचा भरणा 1 लाख रुपयांहून अधिक करणे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन बिनचूक रिटर्न फाईल करा.

– शशांक गुळगुळे

Related Stories

विमाधारकांना 31 मेपर्यंत हप्ते जमा करण्यास सवलत

Patil_p

जागतिक पातळीवर कॉम्प्युटर विक्रीत 11.2 टक्क्मयांनी वाढ

Patil_p

सरकारने फ्लीपकार्टला परवानगी नाकारली

Patil_p

स्टेट बँकेची झेप पहिल्या दहामध्ये

Patil_p

ऑडीची आयात शुल्कात कपातीची मागणी

Patil_p

मारूती सुझुकीच्या उत्पादनात एप्रिलमध्ये घट

Patil_p
error: Content is protected !!